|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.26° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 46 %

वायू वेग : 4.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.41°C - 31.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.77°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.98°C - 32.82°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.83°C - 32.56°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.25°C - 30.88°C

sky is clear

चंपेई सोरेन यांचा झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी

चंपेई सोरेन यांचा झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधीरांची, (०२ फेब्रुवारी) – झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते चंपेई सोरेन यांनी शुक‘वारी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज दुपारी पार पडलेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. जोशी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. चंपेई सोरेन यांच्यासोबत आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँगे‘सचे वरिष्ठ नेते आलमगिर आलम आणि राजदचे नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक‘मात आघाडीतील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. चंपेई...2 Feb 2024 / No Comment /

कडेकोट बंदोबस्तात ज्ञानवापी मशीद संकुलात शुक्रवारची नमाज झाली अदा

कडेकोट बंदोबस्तात ज्ञानवापी मशीद संकुलात शुक्रवारची नमाज झाली अदानवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या आवारात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारची नमाज शांततेत पार पडली. न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी मशीद संकुलाच्या तळघरात नमाजपठण करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने उपासक ज्ञानवापी येथे पोहोचले. एवढ्या मोठ्या संख्येने नमाज्यांचे आगमन होताच पोलीस प्रशासनाला त्यांना परत पाठवावे लागले. मशिदीत जास्त गर्दी असल्याने प्रशासनाने नमाजांना दुसर्‍या मशिदीत नमाज अदा करण्यास सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या तुलनेत आज दुपटीहून अधिक उपासक नमाज अदा करण्यासाठी ज्ञानवापी...2 Feb 2024 / No Comment /

आंध्रात वाहन तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपये जप्त

आंध्रात वाहन तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपये जप्तगुडुरू, (०२ फेब्रुवारी) – आंध्रप्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील गुडुरू येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ६ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. चिल्लाकुरू पोलिस स्टेशन हद्दीतील वरगली क्रॉसिंगवर गुरुवारी पी. साई कृष्णा, एम. श्रीधर व जी. रवी यांच्याकडून ३.६७ कोटी रुपये जप्त करण्यात आले. बेकायदेशीर दारू व इतर प्रतिबंधित वस्तूंच्या वाहनांच्या तपासणीदरम्यान ही रोकड जप्त करण्यात आली, असे गुडुरूचे उपविभागीय पोलिस अधिकारी एम. सूर्यनारायण रेड्डी यांनी वृत्तसंस्थेला...2 Feb 2024 / No Comment /

ज्ञानवापी प्रकरण: व्यास तळघरात ३० वर्षांनंतर पूजा

ज्ञानवापी प्रकरण: व्यास तळघरात ३० वर्षांनंतर पूजावाराणसी, (०१ फेब्रुवारी) – वाराणसीतील ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात ३० वर्षांनंतर अखेर पूजा सुरू झाली. आज (१ फेब्रुवारी) पहाटे अनेक जण पूजा करण्यासाठी तळघरात पोहोचले आहेत. ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजा करण्यात आली. डीएम म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर तळघरातून रात्रभर बॅरिकेडिंग हटवण्यात आले आणि लोक पूजा करण्यासाठी जमू लागले. प्रत्यक्षात बुधवारी (३१ जानेवारी) हिंदू बाजूंना मोठा दिलासा देत न्यायालयाने हिंदूंना संकुलाच्या तळघरात...1 Feb 2024 / No Comment /

साडेसात तासांच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना अटक

साडेसात तासांच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना अटक– हेमंत सोरेन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रांची, (०१ फेब्रुवारी) – झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर संपूर्ण यंत्रणाच बदलून गेली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना साडेसात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आणि त्यांना प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली नाहीत. अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी हेमंत सोरेन यांना रात्री राजभवनात नेले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. तर...1 Feb 2024 / No Comment /

हेमंत सोरेन यांच्याकडे बहुमत नाही!

हेमंत सोरेन यांच्याकडे बहुमत नाही!नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – झारखंड मुक्ती मोर्चाकडे ४८-४९ आमदार आहेत, पण ते फक्त ४२-४३ आमदारांच्या सह्या गोळा करू शकले आहेत. सीता सोरेन, रामदास सोरेन या बैठकीत नव्हते. काँग्रेसचे अनेक नेते बैठकीला नव्हते. मला वाटते त्यांच्याकडे आमदार नाही, चंपाई सोरेन यांच्याकडे बहुमत नसल्याचे गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. झामुमोसोबत सरकार स्थापन करण्याबाबत भाजप खासदार म्हणाले की, भाजप कधीही भ्रष्टाचार्‍यांसोबत सरकार स्थापन करणार नाही. झामुमोचे हात पूर्णपणे...1 Feb 2024 / No Comment /

हिंदूंना मिळाला ज्ञानवापीमध्ये पुजेचा अधिकार

हिंदूंना मिळाला ज्ञानवापीमध्ये पुजेचा अधिकार– हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली माहिती, – सात दिवसांत येथे पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश, वाराणसी, (३१ जानेवारी) – ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने आजपर्यंतचा सर्वात मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाला व्यास तळघरात पूजा करण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत येथे पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्ञानवापी संकुलात दोन तळघर आहेत. याच्या वर ज्ञानवापी मशीद बांधली आहे. हिंदू बाजूला एक तळघर...31 Jan 2024 / No Comment /

हिंदूं मंदिरांमधील ध्वजस्तंभांच्या पुढे जाण्यास गैरहिंदूंना परवानगी नाही

हिंदूं मंदिरांमधील ध्वजस्तंभांच्या पुढे जाण्यास गैरहिंदूंना परवानगी नाही-मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय, – मंदिर ‘पिकनिक स्पॉट’ नाही, चेन्नई, (३१ जानेवारी) – मंदिरांमधील ध्वजस्तंभांच्या पुढे जाण्यास गैरहिंदूंना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे तामिळनाडूतील पलानी मंदिर प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर या आशयाचा फलक लावावा, असा निर्देशही न्यायालयाने दिला. धार्मिक प्रथांनुसार मंदिरांची देखभाल झाली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले. तामिळनाडू उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मदाय यंत्रणेला मंदिरांमध्ये फलक लावण्याचा आदेश दिला. त्यावर...31 Jan 2024 / No Comment /

काँग्रेसला दोनच जागा देणार : ममता बॅनर्जी

काँग्रेसला दोनच जागा देणार : ममता बॅनर्जी– सीपीएमची सांगत सोडावी लागेल, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्याबद्दल वक्तव्य केले आहे. काँग्रेसला दोन जागांची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांना जास्त जागा हव्या होत्या, मात्र त्यांना एकही जागा देणार नाही, असे ममता यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच ममतांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सीपीएमने मला मारहाण केली, मी जिवंत आहे, त्यांना कधीही माफ करू...31 Jan 2024 / No Comment /

कर्नाटक लोकायुक्तांची राज्यभर छापेमारी

कर्नाटक लोकायुक्तांची राज्यभर छापेमारी-१० पेक्षा अधिक जिल्ह्यांत कारवाई, बंगळुरू, (३१ जानेवारी) – उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात कर्नाटक लोकायुक्तालयाच्या अधिकार्यांनी बुधवारी सकाळी राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. राज्य लोकायुक्तांच्या वतीने राजधानी बंगळुरूसह मांड्या, म्हैसूर, हासन, तुमकुरू, चिक्कमंगळुरू, चामराजनगर, बेल्लारी, विजयनगर, दक्षिण कन्नड जिल्ह्यात आज सकाळपासून कारवाई सुरू करण्यात आली. राजधानीतील विद्यारण्यपुरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याचे निवासस्थान, मांड्यामधील कार्यालय, नातेवाईकाचे निवासस्थान आणि नागमंगला येथील फार्महाऊसची झाडाझडती घेण्यात आली. हासन जिल्ह्यात एका अन्न निरीक्षकाचे...31 Jan 2024 / No Comment /

उत्तराखंडमध्ये यूसीसीवर होऊ शकतो मोठा निर्णय

उत्तराखंडमध्ये यूसीसीवर होऊ शकतो मोठा निर्णयडेहराडून, (२९ जानेवारी) – मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड सरकार लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) वर मोठा निर्णय घेऊ शकते. सरकारने समान नागरिकत्व संहिता विधेयक विधानसभेत आणण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. ५ फेब्रुवारीपासून उत्तराखंड विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. उत्तराखंड विधानसभा सचिवालयाने विधानसभेच्या अधिवेशनाची अधिसूचना जारी केली आहे. विधानसभेचे अधिवेशन ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हे तीन दिवसीय अधिवेशन ५ फेब्रुवारी ते ८...31 Jan 2024 / No Comment /

कर्नाटकातील ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतले

कर्नाटकातील ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतले– येडियुरप्पा आणि भाजपा प्रदेशध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत शेट्टर यांची भाजपामध्ये घरवापसी, – केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली, बेंगळुरू, (२५ जानेवारी) – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर पुन्हा भाजपमध्ये ’घरवापसी’ केली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात माजी मुख्यमंत्री-वरिष्ठ पक्ष नेते बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर...26 Jan 2024 / No Comment /