किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलरांची, (०२ फेब्रुवारी) – झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते चंपेई सोरेन यांनी शुक‘वारी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज दुपारी पार पडलेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. जोशी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
चंपेई सोरेन यांच्यासोबत आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँगे‘सचे वरिष्ठ नेते आलमगिर आलम आणि राजदचे नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक‘मात आघाडीतील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. चंपेई सोरेन हे झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. गुरुवारी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता तसेच राजकीय संभ‘म दूर करण्यासाठी शक्य तितक्या लवकर शपथविधी सोहळा पार पाडण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली होती.
सोमवारी विश्वासमत
राज्यपाल जोशी यांनी नवे मुख्यमंत्री चंपेई सोरेन यांना विश्वासमत सिद्ध करण्याची सूचना केली असून, त्यानुसार ते येत्या सोमवारी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करणार आहेत. यासाठी राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
सर्व आमदार हैदराबादेत दाखल
शपथविधी सोहळ्यानंतर झामुमोचे सर्व आमदार रांचीहून हैदराबादेत दाखल झाले. भाजपाकडून आमचे आमदार पळविण्याचा कट रचण्यात आला असल्याने त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना हैदराबादला पाठविले असल्याचा दावा झामुमोच्या नेत्यांनी केला आहे.