किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.56° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.56° से.
27.71°से. - 30.69°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल– हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली माहिती,
– सात दिवसांत येथे पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश,
वाराणसी, (३१ जानेवारी) – ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने आजपर्यंतचा सर्वात मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाला व्यास तळघरात पूजा करण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत येथे पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्ञानवापी संकुलात दोन तळघर आहेत. याच्या वर ज्ञानवापी मशीद बांधली आहे. हिंदू बाजूला एक तळघर होते, जिथे १९९३ पर्यंत पूजा होत असे. मात्र तत्कालीन मुलायमसिंह सरकारने येथील पूजा बंद केली.
आता येथे पूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाने दाखल केली आहे. न्यायालयाने एक दिवस आधी सुनावणी पूर्ण करताना व्यास तळघर जिल्हाधिकार्यांच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. पूजेलाही आज परवानगी देण्यात आली. ज्ञानवापी संकुलात, नंदी भगवानांच्या अगदी समोर, व्यास कुटुंबाचे तळघर आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, १९९३ पर्यंत येथे पूजा होत होती, परंतु नोव्हेंबर १९९३ मध्ये मुलायम सरकारने बेकायदेशीरपणे येथे पूजा करण्यास बंदी घातली होती.