किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.53° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.53° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल-मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय,
– मंदिर ‘पिकनिक स्पॉट’ नाही,
चेन्नई, (३१ जानेवारी) – मंदिरांमधील ध्वजस्तंभांच्या पुढे जाण्यास गैरहिंदूंना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे तामिळनाडूतील पलानी मंदिर प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर या आशयाचा फलक लावावा, असा निर्देशही न्यायालयाने दिला. धार्मिक प्रथांनुसार मंदिरांची देखभाल झाली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले. तामिळनाडू उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मदाय यंत्रणेला मंदिरांमध्ये फलक लावण्याचा आदेश दिला. त्यावर गैरहिंदूंना ध्वजस्तंभाच्या पुढे जाण्यास परवानगी नसल्याचे लिहिलेले असावे, असे सांगितले. हिंदूंना आपला धर्म मानण्याचे आणि पालन करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये ध्वजस्तंभ उभारलेला असतो. या ध्वजस्तंभाच्या आत गैरहिंदूंना प्रवेश देण्यात येऊ नये. त्यासंदर्भात मंदिरामध्ये पाटी लावण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. श्रीमथी यांनी याबाबतचा निर्णय दिला. पलानी मंदिराच्या बोर्डवरील सदस्य सेंथिलकुमार यांनी मद्रास उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटले होते की, प्रसिद्ध पलानी मुरुगन मंदिरात रोज हजारो लोक येतात. यामध्ये गैरहिंदूंची संख्या मोठी असते. त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धार्मिक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे. यावर न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला.
न्यायालय काय म्हणाले?
न्या. एस. श्रीमथी यांनी निकाल देताना सांगितले की, मंदिरात आणि परिसरात गैरहिंदू पर्यटक मोठ्या संख्येने येत असतील, तर मंदिर प्रशासाने खातरजमा करावी. मंदिराला भेट देणार्यांमध्ये सर्वजण भाविकच आहेत का? त्यांची श्रद्धा आहे का? ते हिंदू धर्मातील परंपरा जपतात का? ठरवलेला पोषाख परिधान केलेला आहे का? हे पाहण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनाची आहे. गैरहिंदूंना मंदिरात प्रवेश करायचा असेल, तर मंदिर प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.