किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– येडियुरप्पा आणि भाजपा प्रदेशध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत शेट्टर यांची भाजपामध्ये घरवापसी,
– केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली,
बेंगळुरू, (२५ जानेवारी) – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर पुन्हा भाजपमध्ये ’घरवापसी’ केली आहे.
दिल्लीतील भाजपा मुख्यालयात माजी मुख्यमंत्री-वरिष्ठ पक्ष नेते बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर यांनी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली आहे.
शेट्टर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना हुबळी-धारवाडमधून तिकीट दिले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर पक्षाने त्यांना आमदार केले.
कोण आहेत जगदीश शेट्टर
जगदीश शेट्टर हे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह कर्नाटकातील प्रमुख लिंगायत नेते आहेत. शेट्टर यांचा जन्म कर्नाटकातील केरूर येथे झाला. १९८० च्या दशकात त्यांनी जनता पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१२ ते २०१३ दरम्यान सहा वेळा भाजपाचे आमदार असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.