किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– मंदिर उघडण्याआधीच लांब रांगा,
अयोध्या, (२४ जानेवारी) – सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दोन दिवसांनंतरही भाविकांची गर्दी कायम आहे. मंदिर उघडण्यापूर्वीच पहाटेपासून लाखो लोक थंडीची तमा न बाळगता तेथे उभे असतात. दर्शनासाठी मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. भाविकांना आवरताना पोलिसांची दमछाक होत आहे.
दरम्यान, गर्दीसंबंधी माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थेट अयोध्येत पोहोचले. त्यांच्या सूचनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सध्या पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ८ हजार अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. लखनौमधून अयोध्येला येणार्या बसेसही थांबवण्यात आल्या आहेत. अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी एक नवा विक्रम घडला. मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी पाच लाख रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले. अयोध्येला पोहोचणार्या भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाने येथे येणार्या सर्व वाहनांना तातडीने प्रवेशबंदी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मंदिर परिसराची पाहणी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वात आधी वरिष्ठ अधिकार्यांना घटनास्थळी पाठवले आणि नंतर त्यांनी स्वतः मंदिर परिसरात पोहोचून सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विविध भागांतून अयोध्येत पोहोचणार्या भाविकांना संयम राखण्याचे आणि सहकार्याचे आवाहन केले. दरम्यान, त्यांनी हवाई पाहणी केली. स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी अधिकार्यांना सूचना केल्या.