किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलगुडुरू, (०२ फेब्रुवारी) – आंध्रप्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील गुडुरू येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ६ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
चिल्लाकुरू पोलिस स्टेशन हद्दीतील वरगली क्रॉसिंगवर गुरुवारी पी. साई कृष्णा, एम. श्रीधर व जी. रवी यांच्याकडून ३.६७ कोटी रुपये जप्त करण्यात आले.
बेकायदेशीर दारू व इतर प्रतिबंधित वस्तूंच्या वाहनांच्या तपासणीदरम्यान ही रोकड जप्त करण्यात आली, असे गुडुरूचे उपविभागीय पोलिस अधिकारी एम. सूर्यनारायण रेड्डी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आम्ही सोने खरेदी करण्यासाठी चेन्नईला जात आहेत असे या तिघांनी पोलिसांना सांगितले, परंतु आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी ते कागदोपत्री पुरावा देऊ शकले नाहीत, असे रेड्डी यांनी सांगितले.
दुसर्या घटनेत, एम. लक्ष्मण राव व के. महेश कुमार यांना सकाळी ६ च्या सुमारास चिल्लाकुरू बायपास रोड जंक्शन येथे त्यांच्या वाहनातून ९५.५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. तिसर्या घटनेत मुबारक रेस्टॉरंटजवळ के. सूर्यनारायण मूर्ती याच्याकडून सकाळी ६ वाजताच्या सुमारास ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. सर्व सहा जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र ते एकमेकांशी संबंधित नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.