|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.06° C

कमाल तापमान : 28.68° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 2.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.68° C

Weather Forecast for
Thursday, 09 May

27.58°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.34°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.64°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.98°C - 30.01°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

27.85°C - 30.95°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.27°C - 30.89°C

light rain

पंतप्रधान गति शक्तीचे सार-संकलन केले उद्योग मंत्री गोयल यांनी जारी

पंतप्रधान गति शक्तीचे सार-संकलन केले उद्योग मंत्री गोयल यांनी जारी– पीएम गति शक्तीला दोन वर्षे पूर्ण, नवी दिल्ली,(१४ ऑक्टोबर) – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे पीएम गति शक्तीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीएम गति शक्तीचे सार- संकलन जारी केले. या संकलनामध्ये देशभरातील पीएम गतिशक्तीचा अवलंब आणि फायदे दर्शविणारी काही सर्वोत्तम वापर प्रकरणे समाविष्ट आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, उद्योग आणि...15 Oct 2023 / No Comment /

यूबीएस ब्रोकरेजने स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंग केले कमी

यूबीएस ब्रोकरेजने स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंग केले कमीमुंबई, (१४ ऑक्टोबर) – वैयक्तिक कर्जासारख्या असुरक्षित कर्जात वाढ झाल्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती ढासळू शकते; कारण ज्या कर्जदारांकडे आधीच थकबाकी आहे, अशा कर्जदारांना गेल्या काही वर्षांत बँकांकडून दिल्या जाणार्या कर्जाच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असे विदेशी ब्रोकरेज हाऊस यूबीएसने म्हटले आहे. यासोबतच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंगही कमी केले आहे. एसबीआयचे रेटिंग ‘सेल’ आणि अ‍ॅक्सिस बँकेचे रेटिंग ’न्यूट्रल’ असे करण्यात आले आहे. यूबीएसच्या या अहवालामुळे...14 Oct 2023 / No Comment /

मानव केंद्रित विकासासाठी काम करा: ओम बिर्ला

मानव केंद्रित विकासासाठी काम करा: ओम बिर्लानवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – मानव केंद्रित विकासासाठी काम करण्याचे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केले. हरित ऊर्जा, डिजिटल क्रांती आणि महिलाभिमुख विकास एकविसव्या शतकात जगात मोठे बदल घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त कला. जी-२० देशातील संसदप्रमुखांच्या पी-२० या नवव्या शिखर परिषदेच्या उद्घाटनसत्रात परिषदेमागची पृष्ठभूमी स्पष्ट करताना बिर्ला म्हणाले की, नुकत्याच दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेत नवी दिल्ली घोषणापत्र सर्वसहमतीने स्वीकारण्यात आले. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रभावशाली नेतृत्व...14 Oct 2023 / No Comment /

इन्फोसिसचा कॅम्पस प्लेसमेंटला नकार

इन्फोसिसचा कॅम्पस प्लेसमेंटला नकार-अमेरिकेतील मंदीची भीती, बंगळुरू, (१४ ऑक्टोबर) – आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने सध्या कॅम्पस प्लेसमेंट थांबवले आहे. इन्फोसिसने यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटसाठी अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी सांगितले की, सप्टेंबरचे निकाल जाहीर झाल्यानंतर यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटसाठी कोणतीही योजना नाही. इन्फोसिसकडे सध्या पुरेसे कर्मचारी आहेत आणि बाजारातील वातावरण लक्षात घेऊन सध्या कॅम्पस हायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील दुसरी सर्वांत मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने...14 Oct 2023 / No Comment /

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले गरबा गीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले गरबा गीतमुंबई, (१४ ऑक्टोबर) – यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरबा उत्सवावर खास गाणे लिहिले आहे. हे गाणे चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांच्या डायनॅमिक म्युझिक लेबल जस्ट म्युझिकने रिलीज केले आहे. हे गाणे आणि त्याच्या तयारीचा व्हिडिओ आज यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. जॅकी भगनानीच्या म्हणण्यानुसार, हे गाणे नवरात्रीच्या शुभ सणासाठी स्वर सेट करत आहे. हा गरबा ट्रॅक उत्सवाच्या रंगात रंगला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितेपासून प्रेरणा घेऊन जस्ट म्युझिकने...14 Oct 2023 / No Comment /

यंदा कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण

यंदा कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहणकॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. २०२३ मध्ये, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रग्रहणाच्या छायेत ९ वर्षांनंतर हा उत्सव साजरा केला जाईल. यामुळे पौर्णिमेचे तेज थोडे कमी होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री होणार असले तरी सुतक काळ दुपारी सुरू होईल. त्यामुळे पौर्णिमेची पूजा दुपारीच केली जाईल कारण सुतक काळात पूजा करणे निषिद्ध आहे. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी आकाशातून अमृतवृष्टी होते. त्यामुळे पौर्णिमेच्या...14 Oct 2023 / No Comment /

इस्रायलमधून २१२ भारतीय नागरिक दिल्लीत पोहोचले

इस्रायलमधून २१२ भारतीय नागरिक दिल्लीत पोहोचलेनवी दिल्ली, (१३ ऑक्टोबर) – ऑपरेशन अजय अंतर्गत, इस्रायलमधून २१२ भारतीय नागरिकांना घेऊन पहिले विमान दिल्ली विमानतळावर उतरले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर नागरिकांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी काही प्रवाशांशी चर्चाही केली. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, आमचे सरकार कोणत्याही भारतीयाला कधीही मागे सोडणार नाही. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी, त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान कटिबद्ध आहेत. ज्यांनी हे शक्य केले त्या भारतातील या विमानाच्या क्रूचे आम्ही आभारी आहोत. आमच्या...13 Oct 2023 / No Comment /

गुजरातसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा इशारा

गुजरातसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा इशारानवी दिल्ली, (१३ ऑक्टोबर) – हवामान खात्याने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूसह देशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की पुढील ४८ तासांत अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने केरळमधील १४ पैकी तीन जिल्ह्यांसाठी ’ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याने तिरुअनंतपुरम, कोल्लम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांसाठी ’ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. शुक्रवारी तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम आणि...13 Oct 2023 / No Comment /

’द व्हॅक्सिन वॉर’ला ऑस्करकडून मोठी मान्यता

’द व्हॅक्सिन वॉर’ला ऑस्करकडून मोठी मान्यतामुंबई, (१३ ऑक्टोबर) – ’द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी गेल्या महिन्यात एका सत्य घटनेने प्रेरित असलेली आणखी एक गोष्ट जगासमोर आणली. ’फुक्रे-३’ आणि ’चंद्रमुखी-२’ सोबत त्याचा ’द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, ’द कश्मीर फाइल्स’प्रमाणे हा चित्रपटही प्रेक्षकांच्या मनावर तशी छाप सोडू शकला नाही. द व्हॅक्सिन वॉर’ बॉक्स ऑफिसवर अतिशय संथ गतीने सुरू आहे. चित्रपटाला रोज कमाई करण्यासाठी संघर्ष करावा लागतो....13 Oct 2023 / No Comment /

पी-२० च्या नवव्या शिखर परिषदेचे शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

पी-२० च्या नवव्या शिखर परिषदेचे शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटननवी दिल्ली, (१२ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जी-२० देशांच्या सांसदीय प्रमुखांच्या नवव्या शिखर परिषदेचे (पी-२०) उद्घाटन होणार आहे. द्वारका येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्स्पो सेंटर यशोभूमी येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून, या संमेलनाचा मुख्य विषय एक पृथ्वी, एक परिवार आणि एका भविष्यासाठी संसद आहे. या परिषदेसाठी जी-२० देशांसह २६ देशातील संसदेचे अध्यक्ष, १० उपाध्यक्ष, एक समिती सभापती आणि आयपीयूच्या...12 Oct 2023 / No Comment /

पर्यावरणानुकूल जीवनशैलीच्या अवलंबनाची गरज: ओम बिर्ला

पर्यावरणानुकूल जीवनशैलीच्या अवलंबनाची गरज: ओम बिर्ला– जी-२० देशांच्या संसदप्रमुखांच्या पी-२० परिषदेला प्रारंभ, यशोभूमी (नवी दिल्ली), (१२ ऑक्टोबर) – जगातील सर्वच देशांना वातावरणातील बदलाच्या दुष्परिणामांचा फटका बसला आहे, या जागतिक संकटातून बाहेर येण्यासाठी पर्यावरणानुकूल जीवनशैलीचा अवलंब करण्याची आवश्यकता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गुरुवारी व्यक्त केली. जी-२० देशांतील संसदप्रमुखांच्या पी-२० बैठकीला आजपासून द्वारका परिसरातील नवनिर्मित इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेंशन अ‍ॅण्ड एक्स्पो सेंटर यशोभूमी येथे प्रारंभ झाला. यात ‘पार्लमेंट फोरम ऑन लाईफ’ या विषयावरील पहिल्या सत्राचे उद्घाटन करताना...12 Oct 2023 / No Comment /

गुंजी गावात मोदींनी घेतले वृद्ध महिलेचा आशीर्वाद!

गुंजी गावात मोदींनी घेतले वृद्ध महिलेचा आशीर्वाद!पिथौरागढ, (१२ ऑक्टोबर) – पंतप्रधान मोदींनी आदि कैलास दर्शन आणि पार्वती कुंड मंदिरात सुमारे दोन तास मुक्काम केला. यानंतर त्याचा पुढचा मुक्काम पिथौरागढच्या गुंजी गावात होता. गुंजी पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला तालुक्यात येते. गुंजी गाव कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे धारचुला ते गुंजी गावापर्यंत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. आदि कैलास नंतर पंतप्रधान मोदी गुंजी गावात पोहोचले. पिथौरागढ जिल्हा हा उत्तराखंडचा सीमावर्ती जिल्हा आहे. ते चीन आणि नेपाळला...12 Oct 2023 / No Comment /