किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलचीनची ऑस्ट्रेलियाला धमकी,
बीजिंग, ८ नोव्हेंबर – मलबार युद्ध कवायतीत ऑस्ट्रेलियाने सहभाग घेतल्यामुळे चीन संतप्त झाला असून, अमेरिकेच्या उपद्रवी टोळीत सहभागी झाल्यास आर्थिक वेदना देऊ, असा इशारा ऑस्ट्रेलियाला दिला आहे.
चीनचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या भारतीय उपसागरातील मलबार कवायतींसाठी ऑस्ट्रेलियाने युद्धनौका पाठविल्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र चायना डेलीमधून ऑस्ट्रेलिया सरकारवर टीका करण्यात आली, असे वृत्त ब्रिटनमधील यूके डेली मेलने दिले आहे.
मलबार कवायतींचा पहिला टप्पा नुकताच बंगालच्या उपसागरात पार पडला. यामध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलाने सहभाग घेतला. ही २४ वी आंतरराष्ट्रीय नौदल कवायत ३ नोव्हेंबर रोजी सुरू झाली.
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र धोरण हे धैर्य आणि सातत्यावर आधारित आहे. विशेषतः चीनबाबत हे धोरण असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली होती. मात्र, ऑस्ट्रेलिया सरकारने अमेरिकन प्रशासनाच्या चीनला वेगळे पाडण्याच्या धोरणात सहभागी होऊन आमच्या विश्वासाला तडा दिला आहे, अशी आगपाखड चायना डेलीमध्ये करण्यात आली.
अमेरिकी योजना आणि आघाडीत सहभागी झाल्यानंतर हाती काहीच पडणार नाही, हे ऑस्ट्रेलियाने समजून घेणे आवश्यक आहे. या चुकीच्या निर्णयाची फार मोठी किंमत ऑस्ट्रेलियाला चुकवावी लागणार आहे, अशी धमकी या लेखात देण्यात आली. चीनसोबत सल्लामसलत न करता कोरोना महामारीचा उगम शोधून काढणे आवश्यक आहे, असे ऑस्ट्रेलियाने एप्रिलमध्ये स्पष्ट केल्यानंतर या दोन्ही देशांतील संबंध बिघडले होते.
त्यानंतर ऑस्ट्रेलियातून आयात केल्या जाणार्या बार्लीवर चीनने मोठ्या प्रमाणात साठाविरोधी शुल्काची मोठ्या प्रमाणात आकारणी केली तसेच ऑस्ट्रेलियातील पाच कत्तलखान्यातून आयात होणार्या गोमांसावर प्रतिबंध लावून स्वस्त वाईनवर साठाविरोधी शुल्क आकारले होते. द्विपक्षीय संबंधांत घातपात केल्यामुळे आणि कोरोनाबाबत केलेल्या टीकेची ऑस्ट्रेलियाला मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रातूनही देण्यात आली होती.