किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअधिकृत निकाल आठवड्यानंतर,
यंगून, ९ नोव्हेंबर – म्यानमार संसदेच्या निवडणुकीत आँग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) पार्टीने बहुमत प्राप्त करून सत्ता कायम ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, म्यानमारमधील निवडणूक आयोगाने रविवारी झालेल्या मतदानाचा अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही.
आम्हाला ३२२ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाल्याची खात्रिलायक माहिती तुम्हाला देऊ शकतो, असे एनएलडी पक्षाच्या माहिती समितीचे प्रवक्ते मोन्यावा ऑन शिन यांनी सांगितले. म्यानमार संसदेची एकूण सदस्यसंख्या ६४२ आहे. एकूण ३७७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले असले, तरी त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
म्यानमारमध्ये किती टक्के मतदान झाले, याची अधिकृत आकडेवारी माहिती अद्याप जाहीर झालेली नाही आणि संपूर्ण निकाल जाहीर होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने वर्तवली आहे. आँग सान सू की यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येईल, अशी अपेक्षा होतीच. मात्र, २०१५ साली आघाडी केलेल्या वांशिक अल्पसंख्यक पक्षांसोबत संबंध बिघडल्याने या पक्षाच्या एकूण जागा कमी होतील, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
आँग सान सू की यांच्या लोकप्रियतेमुळेच एनएलडी पक्षाला यश मिळाले आहे. त्यांनी २०१५ मधील निवडणुकीत विजय मिळवून स्टेट कौन्सिलर हे म्यानमारचे प्रमुख पद मिळवले होते. मागील कारकीर्दीत एनएलडीची कामगिरी संमिश्र स्वरूपाची झाली. आर्थिक वृद्धीच्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करू शकले नाही.