किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल– इराणमधून येणार्या शस्त्रांवर नजर,
– युद्धाची व्याप्ती वाढणार,
नवी दिल्ली, (१२ ऑक्टोबर) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. दरम्यान, इस्रायलने एकाच वेळी सीरियातील दमास्कस आणि अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधून येणार्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायली सैन्याने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवरील हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, सीरियन लष्कराने या दोन्ही हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अलेप्पो विमानतळावर इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सीरियाच्या सरकारी टीव्ही वाहिनीने सांगितले की, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास इस्रायली लष्कराने अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट हल्ला केला. त्यामुळे विमानतळांच्या धावपट्टीची दुरवस्था झाली आहे. त्याचवेळी इस्रायल डिफेन्स फोर्स गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करीत आहे. गाझापट्टीमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना गाझापट्टी रिकामी करण्यास सांगितले जात आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा गुरुवारी सहावा दिवस आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ल्ले केले होते.
णकारी योजना का बंद केल्या, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. काँग्रेस नेत्यांच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या तोतयागिरीला बळी पडू नका, असा हल्ला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसवर चढवला. पुढील महिन्यात होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर उत्तर भोपाळ मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आलोक शर्मा यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत शिवराजसिंह चौहान बोलत होते.
काँग्रेस नेते तोतयागिरी करणारे (‘बहुरूपिया’) आहेत. ते खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करतात आणि नंतर सर्व काही विसरतात. केंद्रातील काँग्रेसच्या मागील राजवटीने अनेक घोटाळे करून देश उद्ध्वस्त केला, असे चौहान म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लबाडीचे दुकान उघडले आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सरकारने तरुणांना बेरोजगारी भत्ता, कर्जमाफी, दूध खरेदीवरील बोनस आणि स्वस्त एलपीजी सिलेंडर याविषयी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोपही चौहान यांनी केला.