किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल-अनावरण १४ ऑक्टोबरला,
वॉशिंग्टन, (०३ ऑक्टोबर) – आगामी १४ ऑक्टोबर रोजी उत्तर अमेरिकेच्या मेरीलॅण्ड येथे भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ नावाचा १९ फुटांचा पुतळा, वॉशिंग्टनच्या दक्षिणेस अंदाजे ३५ किलो मीटर अंतरावर असलेल्या मेरीलॅण्डच्या अकोकीक शहरात १३ एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा (एआयसी) भाग आहे. हा भारताबाहेरील डॉ. आंबेडकर यांचा सर्वांत मोठा पुतळा आहे आणि या केंद्रात बांधण्यात येत असलेल्या आंबेडकर स्मारकाचा एक भाग म्हणून स्थापित करण्यात आला आहे, असे एआयसीने सांगितले.
आंबेडकरांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला. त्याच वर्षी १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. १४ ऑक्टोबर हा धम्मचक‘ परिवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच तारखेला मेरीलॅण्डमधील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा पुतळा प्रख्यात कलाकार व शिल्पकार राम सुतार यांनी घडवला आहे. राम सुतार यांनी सरदार पटेल यांचा पुतळासुद्धा उभारला असून, या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणतात. हा पुतळा गुजरातमधील सरदार सरोवर धरणाच्या खाली असलेल्या नर्मदा बेटावर स्थापित केला आहे. अमेरिका व जगाच्या इतर भागातून आंबेडकरी चळवळीचे प्रतिनिधी व त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने या कार्यक‘माला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे त्यात म्हटले आहे.