किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलकाठमांडू, २६ डिसेंबर – संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित केल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी वरिष्ठ सभागृहाचे हिवाळी अधिवेशन बोलावले आहे. तशी शिफारस त्यांनी राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांच्याकडे केली असून, १ जानेवारीपासून हे अधिवेशन बोलाविण्यात यावे, असे त्यांनी यात नमूद केले आहे.
कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्यात आल्यानंतर नेपाळमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. ओली यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पडली असून, प्रचंड आणि ओली या दोघांनीही पक्षावर आपला हक्क सांगितला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत प्रचंड यांची संसदीय पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली, तर त्यापूर्वी ओली यांच्या गटातील नेत्यांनीही ओली यांची निवड केली होती.
मी अजूनही देशाचा पंतप्रधान असल्याने, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अधिवेशन बोलाविण्याचा मला अधिकार आहे, असा दावा ओली यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पाठविलेली शिफारस राष्ट्राध्यक्ष भंडारी यांना प्राप्त झाली असून, अद्याप त्यांनी यावर कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ओली यांच्या या निर्णयाला प्रचंड आणि पक्षातील इतर नेत्यांनी विरोध केला आहे. या निर्णयालाही आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचे प्रचंड यांच्या जवळच्या नेत्याने सांगितले.