किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमॉस्को, १० नोव्हेंबर – आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या युद्धात रशियाचे एक लढाऊ हेलिकॉप्टर पाडले गेले असल्याचे वृत्त समोर आले आहे. आर्मेनियातील यरस्ख गावातील भागात एक रशियाचे लष्करी हेलिकॉप्टर एमआय-२४ क्षेपणास्त्र हल्ल्यात कोसळले आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला चुकून झाला असल्याचे अझरबैजानने मान्य केले आहे. या हल्ल्याबाबत अझरबैजानने दिलगिरी व्यक्त केली आहे.
एका क्षेपणास्त्रामुळे एमआय-२४ हेलिकॉप्टर कोसळले, अशी माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिले आहे. आर्मेनियातील रशियाच्या लष्करी तळाच्या सुरक्षेसाठी या हेलिकॉप्टरद्वारे देखरेख सुरू होती. त्यावेळी क्षेपणास्त्र हल्ला झाला. रशियाच्या लष्करी तळावरील अधिकार्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात हा हल्ला झाला, ते ठिकाण युद्ध सुरू असलेल्या नागोर्नो-कारबाख भागात येत नाही. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टर पाडण्यात आले.
दरम्यान, तुर्की आणि इस्रायली शस्त्रास्त्राच्या आधारे अझरबैजानच्या सैन्याने आर्मेनियाला मोठा धक्का दिला आहे. नागोर्नो-काराबाखची राजधानी स्टेपानाकर्टजवळील शुशी या अत्यंत महत्त्वाच्या शहरावर अजरबैझानच्या फौजांनी ताबा मिळवला आहे.
युद्धबंदीस आर्मेनिय, अझरबैजान राजी
येरेवान – रशियासोबत झालेल्या करारानुसार नागोर्नो-काराबाख प्रदेशावरील युद्ध थांबवण्याबाबत आर्मेनिया आणि अझरबैजान राजी झाले आहेत. या कराराप्रमाणे रशिया या भागात २ हजार सैनिकांचा समावेश असलेले शांती सैन्य तैनात करणार आहे.
नागोर्नो-कारबाख हा भाग १९९४ पासून ऑर्मेनियाचा पाठिंबा असलेल्या पारंपरिक आर्मेनियन लष्कराच्या ताब्यात आहे. फुटीच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या युद्धावेळी आर्मेनियाने या भागावर ताबा मिळवला होता. तेव्हापासून या भागात चकमकी झडत असून, २७ सप्टेंबरपासून येथे युद्ध सुरू झाले आहे.
यापूर्वी काही वेळा युद्धबंदी झाली. मात्र, नंतर पुन्हा युद्ध सुरू झाले. अझरबैजानने रविवारी महत्त्वपूर्ण शुशी शहरासह काही मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे यावेळी जाहीर करण्यात आलेल्या युद्धबंदीचे पालन केले जाईल, अशी शक्यता आहे.
ही युद्धबंदी माझ्यासाठी आणि आमच्या नागरिकांसाठी वेदनादायी असल्याचे आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनियन यांनी फेसबुकवर म्हटले आहे. युद्धबंदीच्या घोषणेनंतर हजारो लोक आर्मेनियाची राजधानी येरेवानच्या चौकात गोळा झाले आणि त्यांनी या कराराच्या विरोधात नारेबाजी केली. काही जणांनी मुख्य सरकारी इमारतीत प्रवेश करून पाशिनियन यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.