किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसौदीला दिलेली धमकी पाकिस्तानला पडली महागात,
फक्त एक महिन्याचीच मुदत,
इस्लामाबाद/रियाध, ७ नोव्हेंबर –
काश्मीर मुद्यावरून सोदी अरबला धमकी देणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. सौदीने पाकिस्तानसोबतची मैत्री संपुष्टात आणली असून, दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करण्यासाठी अवघ्या एक महिन्याची मुदत दिली. आधीच दिवाळखोरीत असलेल्या पाकिस्तानची यामुळे चांगलीच कोंडी होणार आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीर मुद्यावर भारताची बाजू न घेण्याची उघड धमकी सौदीला दिली होती. सौदीचे सरकार आपल्यावर नाराज झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वरिष्ठ मंत्र्यांना सौदीची मनधरणी करण्यासाठी पाठविले. त्यानंतर लष्करप्रमुख कमर बाजवाही गेले, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट आमच्या कर्जाची पुढील महिन्यात परतफेड केली जावी, असे सौदीने स्पष्टपणे बजावले. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांच्या मते, दोन अब्ज डॉलर्सची रक्कम लहान नसून, त्याची व्यवस्था करणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीनपुढे हात पसरण्याची वेळ पाकिस्तान सरकारवर आली आहे.
चीनकडूनही इतकी मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा नसल्याने, इतर स्रोतांकडूनही पाकिस्तान कर्ज घेण्याची तयारी करीत आहे. कर्जबाजारी झालेल्या आणि महागाई सर्वोच्च शिखरावर असलेल्या पाकिस्तानची गंगाजळी सध्या १२ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्याला हात न लावता या पैशाची व्यवस्था करण्याचे मोठे संकट पाकिस्तानवर असल्याचे द एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तान पूर्णपणे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असताना, सौदीने मैत्रीच्या नात्याने पाकिस्तानला ६.२ अब्ज डॉलर्सची मदत दिली होती. यातील फक्त एक अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ताच पाकिस्तान देऊ शकला आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम देखील चीननेच दिली होती.