किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकाठमांडू, (५ जून) – नेपाळमध्ये गेल्या दशकात हिंदू आणि बौद्धांची लोकसंख्या थोडी कमी झाली आहे, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांची लोकसंख्या किरकोळ वाढली आहे. देशाच्या जनगणनेच्या अहवालात ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ डेमोग्राफीने प्रसिद्ध केलेल्या २०२१ च्या जनगणनेच्या अहवालानुसार, ८१.१९ टक्के हिंदूसह नेपाळमध्ये हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे. देशातील २,३६,७७,७४४ लोक हिंदू आहेत तर २३,९४,५४९ लोक बौद्ध आहेत. बौद्ध धर्म हा देशातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात जास्त अनुसरला जाणारा धर्म आहे आणि ८.२ टक्के बौद्ध आहेत. नेपाळमध्ये इस्लाम मानणारे १४,८३,०६० लोक आहेत आणि ते एकूण लोकसंख्येच्या ५.०९ टक्के आहेत. हा तिसरा सर्वात व्यापक मान्यता असलेला धर्म आहे.
जनगणनेच्या अहवालानुसार, गेल्या दशकात हिंदू आणि बौद्धांची लोकसंख्या अंशतः कमी झाली आहे. तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि किरात यांची लोकसंख्या किरकोळ वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत हिंदू आणि बौद्धांच्या संख्येत अनुक्रमे ०.११ टक्के आणि ०.७९ टक्के घट झाली आहे. तर मुस्लिम, किरात आणि ख्रिश्चनांची संख्या अनुक्रमे ०.६९, ०.१७ आणि ०.३६ टक्क्यांनी वाढली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, देशात ८१.३ टक्के हिंदू, ९ टक्के बौद्ध, ४.४ टक्के मुस्लिम, ३.१ टक्के किरात आणि ०.१ टक्के ख्रिश्चन होते.