किमान तापमान : 26.01° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.01° से.
24.9°से. - 28.08°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.33°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.18°से. - 28.76°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.39°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.17°से. - 28.51°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 27.12°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल– २४ तासांत कार्यक्रम स्थळ रिकामे करा,
काठमांडू, (२० नोव्हेंबर) – नेपाळ सरकारने इज्तमा या मुस्लिमांच्या वार्षिक धार्मिक मेळाव्यावर बंदी घातली आहे. धार्मिक संवेदनशीलतेचा दाखला देत नेपाळच्या गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. नेपाळ सरकारने इज्त्मासाठी उभारण्यात आलेले तंबू आणि त्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांना २४ तासांत कार्यक्रम स्थळ सोडण्याचा आदेश दिला आहे.
नेपाळच्या पूर्व भागात असलेल्या सुनसारी जिल्ह्यातील दुहबी आणि इटहरी येथे २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान इज्त्माची तयारी सुरू होती. यासाठी ८० एकर जागेवर तंबू उभारण्यात आले असून त्यात सुमारे ५० हजार लोकांची राहण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जगभरातील अनेक देशांतील मुस्लिमांना या इज्त्मासाठी आमंत्रित करण्यात आले होते. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सुनसारी जिल्ह्यात मुस्लिमांच्या एवढ्या मोठ्या मेळाव्याने नेपाळमध्ये धार्मिक भावना भडकवण्याची शक्यता तर होतीच पण हा जिल्हा भारतीय सीमेला लागून असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सुनसारीच्या जिल्हाधिकारी हुमकला पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहून या सर्व आव्हानांचा उल्लेख करून त्यावर वरिष्ठांचे मत मागवले होते. गृहमंत्रालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत बंद करण्याचा आदेश दिला. गृह मंत्रालयाच्या स्पष्ट आदेशानंतर आयोजकांना कार्यक्रम थांबविण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी पांडे म्हणाल्या. इज्त्माच्या नावाखाली काही जिहादी व धर्मांध मुस्लिम मौलाना येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती, ज्यांना भारतासह इतर अनेक देशांनी येथे येण्यास बंदी घातली आहे.