किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल– सर्व जागांवर देणार उमेदवार,
इस्लामाबाद, (२६ डिसेंबर) – मुंबई २६/११ हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद पाकिस्तानच्या निवडणुकीत उतरणार आहे. याआधीच आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हाफिझ सक्रिय होता. मरकजी मुस्लिम लीग पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार्या निवडणुकीच्या रिंगणात असेल, अशी घोषणा हाफीझने केली आहे. हाफीझच्या पक्षाने संसदीय आणि राज्यांच्या विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हाफिझचा मुलगा तल्हा सईददेखील नशीब आजमावणार आहे.
तल्हा नॅशनल असेंब्ली मतदारसंघ लाहोरमधून निवडणूक लढवणार आहेत. पीएमएमएलचे केंद्रीय अध्यक्ष खालिद मसूद सिंधू हा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. हाफीझ सईदच्या या पक्षाचे निवडणूक चिन्ह खुर्ची आहे.
मरकजी मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याने पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ला सांगितले की, पक्ष देशभरातील सर्व संसदीय जागा आणि प्रांतीय जागांसाठी उमेदवार उभे करणार आहे. आम्ही एकही जागा सोडली नसल्याचा दावा ताबीश कय्युमने केला. मात्र, इतर पक्षांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आघाडी करीत त्यांच्यासाठी काही जागांवरून उमेदवार मागे घेणार असल्याचे हाफीझच्या पक्षाने स्पष्ट केले.