किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– वैज्ञानिकांनी व्यक्त केली ही भीषण नैसर्गिक संकटाचे सावट,
पॅरिस/नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पॅरीस ऑलिम्पिक्स आता अवघ्या सहा महिन्यांवर आले असताना, वैज्ञानिकांच्या एका अहवालाने क्रीडाप्रेमींची झोप उडवली आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जगभरातील क्रीडापटू चार वर्षांपासून तयारी करत आहेत. तर, क्रीडाप्रेमी दणकेबाज क्रीडा सादरीकरण बघण्यास उत्सुक आहेत. पण, त्यांना हे माहिती नाही की, यंदाच्या ऑलिम्पिक्सवर एका भीषण नैसर्गिक संकटाचे सावट आहे. सध्या पॅरीसमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. पण, हवामान अभ्यासकांच्या मते, आगामी सहा महिन्यात पॅरीसमधील वातावरण अचानक बदलून तिथे भीषण उकाडा आणि गरमी सुरू होण्याची शक्यता आहे.
पॅरीस ऑलिम्पिक्सच्या दरम्यान, पॅरीसमध्ये भीषण हिटवेव्ह अर्थात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अल निनोच्या प्रभावामुळे फ्रान्सच्या राजधानीत आजवरचे विक्रम मोडीत काढणारी भीषण गरमी होण्याची भिती वर्तविण्यात आली आहे. अभ्यासकांनी याची तुलना फ्रान्समध्ये २००३ मध्ये पडलेल्या उष्णतेच्या लाटेशी केली असून, गेल्या २० वर्षांत पर्यावरणीय संतुलन आणखीच बदलले आणि बिघडल्याचे दिसून आले आहे. गेल्या ५ वर्षांत पॅरीसच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी ऑलिम्पिक्स साधारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन ऑगस्टच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यात आहे. याच कालावधीत पॅरीसमधील उष्णता आपल्या सर्वोच्च बिंदूवर राहणार आहे. या उष्णतेचा फटका क्रीडापटूंच्या प्रकृतीवर आणि त्यांच्या सादरीकरणाला बसणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे खेळाडूंना जास्त घाम येणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे.
क्रीडापटू हिटवेव्ह ट्रेनिंग घेत असून, वाढीव तापमानात त्यांनी आपला सराव सुरूच ठेवला आहे. काही देशांतील प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना विशेष प्रशिक्षणही देत आहेत. शिवाय, जास्तीत जास्त क्रीडाप्रकार इनडोअर कसे करता येतील? यावर काम सुरू आहे. क्रीडापटूंच्या निवासाची व्यवस्थाही वातानुकूलित करण्यात आली असून, जागोजागी शेड्स उभारण्यात आले आहेत. वृक्षारोपण, हवा खेळती राहण्यासाठी सोय, नैसर्गिक-जियो थर्मल कूलिंग यंत्रणा लावण्यात येत आहेत. खेळाडूंना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांच्या सादरीकरणावर परिणाम होऊ नये, तसेच प्रेक्षकांनाही क्रीडप्रकारांचा आनंद घेता यावा, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न ऑलिम्पिक व्यवस्थापनाकडून केले जात आहेत. टोकियो ऑलिम्पिक्स हे सर्वाधिक तापमानात झालेले ऑलिम्पिक्स मानले जातात. त्यावेळी, ३० अंश सेल्सियस तापमानासह ८० टक्के दमट वातावरणामुळे क्रीडापटूंच्या प्रकृतीमध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या.