किमान तापमान : 29.76° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.48°से. - 30.26°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२२ जुन) – बांगलादेशमध्ये हिंसक संघर्षांदरम्यान ४,५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. या हिंसाचारमध्ये १५० हून अधिक लोक मारले गेले आहेत. नेपाळमधील ५००, भूतानमधील ३८ आणि मालदीवमधील एक विद्यार्थीही भारतात पोहोचल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक अधिकार्यांच्या सतत संपर्कात आहे. आतापर्यंत ४,५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय नागरिकांच्या सीमेवरील प्रवेश बिंदूवर सुरक्षित प्रवासासाठी उच्चायुक्तालय व्यवस्था करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले होते की बांगलादेशमध्ये सुमारे १५,००० भारतीय नागरिक आहेत ज्यात ८,५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये हिंसक संघर्ष सुरूच आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने आता या संपूर्ण प्रकरणावर आपला निर्णय दिला आहे आणि सरकारी नोकर्यांमधील आरक्षण कमी केले आहे. याकडे सरकारचा मोठा पराभव म्हणून पाहिले जात आहे, कारण सरकार आरक्षणाचा निर्णय मागे घेण्यास तयार नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की ९३ टक्के सरकारी नोकर्या गुणवत्तेवर आधारित प्रणालीच्या आधारे वाटप केल्या पाहिजेत आणि उर्वरित सात टक्के १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात लढलेल्या आणि इतर श्रेणींमध्ये लढलेल्यांच्या नातेवाईकांसाठी सोडल्या पाहिजेत. यापूर्वी युद्धसैनिकांच्या नातेवाईकांसाठी नोकर्यांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत आरक्षण होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय फेटाळून लावला आहे. याकडे विद्यार्थ्यांचा मोठा विजय म्हणून पाहिले जात आहे.