किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअधिकृत निकालांची प्रतीक्षा करणार,
बीजिंग, ९ नोव्हेंबर – ज्यो बायडेन यांनी आपल्या विजयाची घोषणा केली असली, तरी आम्ही अमेरिकेतील कायदे आणि कार्यपद्धतीनुसार अधिकृतपणे जाहीर होणार्या निकालांची प्रतीक्षा करणार आहोत. त्यामुळे बायडेन यांचे आम्ही सध्याच अभिनंदन करणार नाही, अशी ताठर भूमिका चीनने आज सोमवारी घेतली.
बायडेन यांच्या विजयावर कायदेशीर शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे. त्यांच्या एकतर्फी घोषणेला आमच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. इतर काही देशांनी बायडेन व हॅरिस यांचे अभिनंदन केले असताना, चीनने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया का दिली नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
बायडेन यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत:च्या विजयाची घोषणा केली आणि त्याची आम्ही नोंद देखील घेतली आहे, पण अमेरिकेतील कायद्यानुसार अद्यापही निकाल जाहीर करण्यात आलेले नाही. कोणत्याही देशात निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रथा आणि परंपरा आहेत. त्याचेच आम्ही पालन करीत आहोत. मतमोजणीच्या या वादात डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेणार, याकडेही आमचे लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या कार्यकाळात तणावपूर्ण झालेल्या चीन-अमेरिका संबंधांबाबत विचारले असता, ते म्हणाले की, दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून मतभेद सोडवावे, परस्परांचा सन्मान करावा, सहकार्य वाढवावे आणि एकमेकांचे हित जोपासण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे.