किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादललंडन, (०१ फेब्रुवारी) – ब्रिटनमध्ये राहणार्या हिंदूंमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबद्दल संताप आहे. कारण ब्रिटनमधील सुमारे ५०० पैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. अनेक मंदिरांमध्ये अनेक कामे ठप्प झाली आहेत. सुनक सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नसल्याचे कारण आहे. माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सुमारे २० लाख भारतीय हिंदू राहतात. मंदिरातील सेवा कार्याबरोबरच, पुजारी भारतीयांचे गृहप्रवेश करणे आणि विवाह समारंभ देखील करतात. बर्मिंगहॅममधील लक्ष्मीनारायण मंदिराचे सहाय्यक पुजारी सुनील शर्मा म्हणाले की, सुनक सरकारने व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेला गती देणे अपेक्षित होते.
हिंदू असल्याने ऋषी सुनक यांना आमच्या समस्या समजतील, परंतु सरकार तसे करण्यात आजवर अपयशी ठरले आहे. युनायटेड टेंपल ग्रुपने हा मुद्दा परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली यांच्याकडे मांडला आहे. लेबर पार्टीचे ज्येष्ठ खासदार गॅरेथ थॉमस यांनीही गृहमंत्र्यांना पत्र लिहून टियर ५ व्हिसा प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली आहे. ब्रिटनमध्ये धर्मगुरूंसाठी टियर-५ धार्मिक व्हिसा जारी केला जातो. हा तात्पुरता व्हिसा आहे. मंदिर समिती नवीन पुजार्यासाठी व्हिसाचा कालावधी संपण्याच्या ६ महिने आधी व्हिसा अर्ज सुरू करते, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये मंजुरी मिळत नाही. टियर-५ धार्मिक व्हिसाची मुदत दोनवरून तीन वर्षांपर्यंत वाढवावी, अशी भारतीयांची मागणी आहे.