किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– अमेरिकेच्या संसदीय समितीची शिफारस,
– चीनला घेरण्यासाठी रणनीती,
वॉशिंग्टन, (२८ मे) – विस्तारवादी चीनला घेरण्यासाठी अमेरिकेने नवीन रणनीती तयार केली आहे. तैवानमधील चीनच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी भारताचा समावेश ‘नाटो प्लस ५’ या गटात करावा, अशी शिफारस अमेरिकन काँग्रेसच्या निवड समितीने केली आहे. ही एक उच्चस्तरीय समिती असून, चीन आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंधाचा तसेच घडामोडींचा अभ्यास करून अमेरिकीच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी गठित करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती आहे.
भविष्यात चीनवर आर्थिक निर्बंध लादण्याची वेळ आली तर, ते जास्त प्रभावी होण्यासाठी सध्याच्या क्वॉड संघटनेसोबत अधिक व्यापक प्रयत्न करण्याची शिफारसही समितीने केली आहे. क्वॉड संघटनेत भारताचा समावेश आहे. ही संघटना अमेरिकेच्या पुढाकाराने भारतीय प्रशांत क्षेत्रात येणार्या देशांमधील सामरिक द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानचाही समावेश आहे.
युक्रेनचाही नाटोमध्ये समावेश
नाटो उत्तर अटलांटिक सामंजस्य कराराने एकत्रित आलेल्या देशांची संघटना आहे. यात प्रामु‘याने अमेरिका आणि युरोपातील देशांचा समावेश आहे. अलिकडेच युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करण्यात आला. जे देश उत्तर अटलांटिक परिक्षेत्रात नाही, मात्र त्यांचे अमेरिकेशी मैत्रीचे संबंध आहेत, अशा देशांसाठी ‘नाटो प्लस ५’ अशी एक वेगळी सहयोगी संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्यात सध्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया या पाच देशांचा समावेश आहे. त्यामुळेच या संघटनेला ‘नाटो प्लस ५’ असे म्हटले जाते. आता या संघटनेचा विस्तार करून भारताचाही समावेश केला जावा, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे.
या समितीचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. ‘तैवान परिक्षेत्रात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहा शिफारसी’ असे या अहवालाचे नाव आहे. या गटात सध्या नाटोचे सर्व ३१ सभासद देश आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान व दक्षिण कोरियाचा समावेश आहे. आशियातील या सर्व देशांचे नाटो तसेच अमेरिकेशी मैत्रिपूर्ण संबंध आहेतच शिवाय अमेरिकेसोबत सामरिक आणि द्विपक्षीय संबंधही आहेत.
संरक्षणविषयक तंत्रज्ञान मिळणं आणखी सुलभ होणार
सध्या भारताचे अमेरिकेसोबत सामरिक किंवा शस्त्रास्त्र करार नाही; मात्र अमेरिकेने भारताला प्रमुख सामरिक मित्र असा विशेष दर्जा दिला आहे. भारताला अमेरिकेकडून मिळालेल्या या विशेष दर्जामुळे सामरिक तंत्रज्ञान आयात करणे सुलभ झाले आहे. भारताचा समावेश ‘नाटो प्लस ५’ गटात झाला तर, अमेरिकेकडून युद्धसाहित्य आणि संरक्षणविषयक तंत्रज्ञान मिळणे आणखी सुलभ होणार आहे.