किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– इंधनाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या सौदी प्रशासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय,
नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – इंधनाचे नवनवे पर्याय जगभरात उपलब्ध होत असताना, नजिकच्या भविष्यात पारंपरिक इंधन व्यवसायाला नुकसान सोसावे लागू शकते. सौदी अरबची तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच खनिज तेल आणि सहउत्पादनांवर अवलंबून आहे. मात्र, जगभरातील बदलता ट्रेंन्ड बघता, इंधनाच्या व्यवसायातून उत्पन्नावर अवलंबून असलेल्या या देशाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मक्का आणि मदीना या इस्लामधर्मियांच्या दोन पवित्र धर्मस्थळांवर आता विवाह सोहळे आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. जगभरातील श्रीमंत इस्लामधर्मियांची या दोन स्थळांना पहिली पसंती मिळते आहे, हे विशेष!
सौदी प्रशासनाने जगभरातील मुस्लिम पर्यटक आणि हाजींना सौदी अरबकडे आकर्षित करण्यासाठी, मक्का येथे ग्रॅण्ड मशिद आणि मीना येथे ‘पैगंबर की मशीद’मध्ये विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. त्या देशाचे पंतप्रधान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्त्वात सौदी अरब हा देश आपली, रूढीवादी इस्लामिक प्रतिमा बदलून आधुनिकतेकडे पाऊल टाकणारा देश ठरतो आहे. यातून, संबंधित क्षेत्रातील कंपन्यांसाठी या क्षेत्रात अधिक रोजगारनिर्मितीची संधी मिळणार आहे. बदलत्या जागतिक गरजा आणि भविष्यातील बदलांची नांदी बघता, पर्यटनासोबतच संस्कृती आणि फॅशनच्या क्षेत्रातही नवी ओळख निर्माण करण्याचा सौदी अरबचा प्रयत्न राहणार आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सौदी अरबच्या हज आणि उमराह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशांनुसार आता मक्का आणि मदीना या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये निकाह सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. सौदी मजून अर्थात विवाह अधिकार्यांच्या मते, ‘पैगंबर मोहम्मद की मशीद’ पूर्वीपासूनच विवाह सोहळ्यांसाठी विशेष मानली जात होती. या मशिदीमध्ये विवाह सोहळे आयोजित करणे, ही सामान्य लोकांसाठी नेहमीचीच बाब असून त्यात काही विशेष नसल्याचे मजून अधिकार्यांचे मत आहे. निकाहच्या कार्यक्रमात सर्व नातेवाईकांना बोलावण्याची पद्धत आहे. पण, बहुतांश वेळी या कार्यक्रमात मुलीकडच्या नातेवाईकांना बरेचदा आमंत्रण दिले जात नाही. अशावेळी पैगंबर की मशीद किंवा क्युबा मशीद (इस्लाम धर्मातील पहिली मशीद) या पवित्र ठिकाणी निकाह समारोहाचं आयोजन केलं जातं.