किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– नवीन अभ्यासातील माहिती,
लंडन, (१७ डिसेंबर) – प्रत्येक श्वास ग्लोबल वॉर्मिंगला बळ देत आहे. मानव श्वास सोडतो त्यावेळी ग्लोबल वॉर्मिंग निर्माण करणारे वायू बाहेर निघतात, असा दावा ब्रिटनमधील संशोधकांनी अलिकडेच प्रकाशित केलेल्या एका नवीन संशोधनात केला आहे. हे संशोधन ‘प्लॉस वन’ या मासिकात प्रकाशित झाले आहे. आपण श्वास सोडतो, त्यावेळी त्यातील मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड ब्रिटनमधील हरितगृह वायू उत्सर्जनाच्या ०.१ टक्क्यापर्यंत बनतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. मानवाद्वारे एकदा सोडलेल्या अपानवायू किंवा ढेकरचा विचार केल्यास, हे स्पष्ट होते की, मानव केवळ फुफ्फुसांद्वारे श्वास सोडून ग्लोबल वॉर्मिंगला चालना देत आहे.
एडिनबर्गमधील यूके सेंटर फॉर इकॉलॉजी अॅण्ड हायड्रॉलॉजीच्या डॉ. निकोलस कोवान यांच्या नेतृत्वाखाली नवीन अभ्यास तयार करण्यात आला. श्वासोच्छवासामुळे पृथ्वीच गुदमरत असल्याचे पुरावे अगदी स्पष्ट आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे त्यांनी संशोधनात म्हटले आहे. प्रत्येक व्यक्ती श्वास सोडतो, त्यावेळी तो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. परंतु, संशोधकांनी नवीन अभ्यासात मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडवर लक्ष केंद्रित केले. मिथेन आणि नायट्रस हे दोन्हीही शक्तिशाली हरितगृह वायू आहेत, पण श्वास सोडताना ते अत्यल्प प्रमाणात सोडले जात असल्याने त्याच्या ग्लोबल वॉर्मिंगवर होणार्या परिणामाकडे दुर्लक्ष केले जाते. आम्ही या अभ्यासात केवळ श्वासोच्छवासातील उत्सर्जनाची नोंद केली. पोटातील वायूच्या उत्सर्जनामुळे यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे.
पशुधन-वन्यप्राण्यांकडून नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन
पशुधन आणि वन्यप्राण्यांकडून नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन केले जाते. तो ब्रिटनमधील नायट्रस ऑक्साईडच्या उत्सर्जनाचे एक लहान पंरतु बेहिशेबी स्रोत असू शकतो, जो राष्ट्रीय स्तरावरील उत्सर्जनाच्या एक टक्क्यापेक्षा जास्त असू शकतो, असे निकोलस कोवान यांनी सांगितले.
अशी आहे प्रक्रिया
मानवाकडून होणारे उत्सर्जन नगण्य आले, या गृहितकाबाबत आपल्याला सावधगिरी बाळगायला पाहिजे, असे कोवान यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी मानव श्वास घेतो, तेव्हा हवा फुफ्फुसात प्रवेश करते आणि त्या हवेतील प्राणवायू रक्तात जातो आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, इतर निरुपयोगी वायू रक्तातून फुफ्फुसात जातात व श्वास बाहेर टाकला जातो.
ठळक मुद्दे
– १०४ प्रौढ स्वयंसेवकांकडून मानवी श्वासात मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड उत्सर्जनाची तपासणी.
– नायट्रस ऑक्साईडचे प्रत्येकाकडून उत्सर्जन. ३१ टक्के सहभागींच्या श्वासामध्ये आढळला मिथेन.
– ब्रिटनमध्ये मिथेनचे मानवी उत्सर्जन ०.०५, तर नायट्रस ऑक्साईड ०.१ टक्का.
– श्वासातील वायू आणि आहारात कोणताही संबंध आढळला नाही.
– शाकाहारी व मांसाहारींच्या श्वासातील मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण सारखेच.