किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – सौदी अरबमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी अतिशय पवित्र तीर्थस्थळ असलेल्या मक्का शहराच्या जवळ हा साठा सापडला आहे. सौदीच्या प्रशासकीय अधिकार्यांनी याविषयी अधिकृत घोषणा केली आहे. मक्का शहरापासून जवळच अल खुरमा गवर्नरेट भागात हा सुवर्णसाठा सापडला आहे. याच भागात मंसूराह मस्सारा ही सोन्याची सर्वात मोठी खाण स्थित आहे. सौदी अरबची खाणकाम कंपनी द सौदी अरेबियन मायनिंग कंपनी (मादेन)च्या वतीने, यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, उत्खनन कार्य सुरू झाले आहे.
वर्ष २०२२ पासून मादेनच्या वतीने, सोन्याचा शोध घेण्यासाठी व्यापक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात या साठ्याचा शोध लागल्याने कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सोन्यामुळे सौदी अरबच्या अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळणार असून, अब्जावधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. मस्सारा खाणीपासून २५ किलोमीटर अंतरावर जबल अल-गदरा आणि बीर अल-तवीलामध्येही खाणकाम सुरू झाले आहे.
२०२३ च्या अंतापर्यंत मस्सारा खाणीतून ७० लाख औंस सोने काढण्यात आले असून, या खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता प्रतिवर्ष अडीच कोटी औंस इतकी आहे. पृथ्वीवर अंटाक्रि्टका वगळता जगभरातील सर्वच देशांमध्ये कमीअधिक प्रमाणात सोन्याच्या खाणी आहेत. सर्वाधिक सोन्याचे उत्पादन चीनमध्ये होते. जगाच्या एकून सोने उत्पादनापैकी १० टक्के सोनं एकटा चीन उत्पादीत करतो. वर्ष २०२२ मध्ये चीनने ३७५ टन सोन्याचे उत्पादन घेतले आणि त्यानंतर रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि घाना या देशांनी सोन्याचे उत्पादन घेतले.