|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.5° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.71°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.15°से. - 29.76°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.65°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.1°से. - 31.17°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.59°से. - 30.7°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.71°से. - 30.37°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » कला भारती » प्रभासच्या चित्रपटाचा परदेशात मोठा विक्रम

प्रभासच्या चित्रपटाचा परदेशात मोठा विक्रम

मुंबई, (२९ ऑगस्ट) – प्रभासच्या मागील काही चित्रपटांनी त्याच्या फॅन फॉलोइंगच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा सहज पार केला असेल, पण ’आदिपुरुष’ ते ’राधे श्याम’पर्यंतच्या त्याच्या शेवटच्या काही चित्रपटांची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या नाही. बाहुबलीच्या यशाने त्याला संपूर्ण भारतातील स्टार बनवले. ’आदिपुरुष’नंतर प्रभास लवकरच ’सालार’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
सालार या चित्रपटाचे परदेशात आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. प्रभासच्या चित्रपटाने आतापर्यंत अमेरिकेत कोटींची कमाई केली आहे. प्रभास आणि श्रुती हासन स्टारर चित्रपट ’सालार’ २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे, याचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग अमेरिकेसह परदेशात सुरू झाले आहे.
’सालार’चे आतापर्यंत यूएसएमध्ये अनेक शो बुक झाले आहेत. सालारने शनिवारपर्यंत ११६३९ विक्री केली होती. रविवारी हा आकडा वाढला आणि आतापर्यंत यूएसएमध्ये चित्रपटाच्या ३३७ ठिकाणी १४६१९ तिकिटे विकली गेली आहेत. प्रभासच्या या मेगा बजेट चित्रपटासाठी आतापर्यंत १०१२ शो बुक करण्यात आले आहेत. प्रभासचा चित्रपट सालार हा मूळत: तेलगू भाषेत बनलेला हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये त्याच्या आणि श्रुती हासनशिवाय पृथ्वीराज सुकुमार, जगपती बाबू, टिनू आनंद, श्रिया रेड्डी यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटापूर्वी दिग्दर्शक प्रशांत नील यांनी यशसोबत केजीएफ १ आणि केजीएफ २ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

Posted by : | on : 29 Aug 2023
Filed under : कला भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g