किमान तापमान : 28.09° से.
कमाल तापमान : 28.3° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.09° से.
27.56°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – बॉलीवूड इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक, आर. माधवन यांना एफटीआयआयचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल म्हणून निवड झाली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करून माधवनचे अभिनंदन करताना अनुराग ठाकूर यांनी लिहिले की- ’आर माधवन जी एफटीआयआयचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मला पूर्ण आशा आहे की तुमचे ज्ञान आणि नैतिकता या संस्थेला अधिक उंचीवर नेईल. उच्च स्तरापर्यंत बदल दिसतील.माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत. अनुराग ठाकूरच्या या ट्विटवर अभिनेता आर. माधवनने त्यांचे आभार मानत उत्तर दिले आणि लिहिले – ’तुम्ही जे काही बोललात ते वाचून मला खूप आनंद झाला. मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचाही प्रयत्न करेन.
अलीकडे आर. माधवनच्या ’रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट बनवणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी निवड असल्याचे माधवनने सांगितले होते.