किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 29.64° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.64° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (०९ सप्टेंबर) – गंभीर समस्यांना संवेदनशील पद्धतीने दाखवण्यासाठी प्रसिद्ध असलेला विवेक अग्निहोत्रीचा ’द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये वैज्ञानिक पल्लवी जोशी, नाना पाटेकर यांच्यासह अनेकांचे चेहरे दाखवण्यात आले आहेत. मात्र, अनुपम खेर यांचा लूक समोर आलेला नाही. आता निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.
याचा फर्स्ट लुक विवेक अग्निहोत्रीने ट्विटरवर शेअर केला आहे. यात रायमा सेन आणि मोहन कपूर यांसारख्या स्टार्सची पहिली झलकही पाहायला मिळते. ’द व्हॅक्सिन वॉर’ या महिन्यात २८ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे, त्याच दिवशी ’फुक्रे ३’ रिलीज होत आहे. म्हणजेच बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दोन मोठ्या चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या फर्स्ट लूकने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे हा भारतातील पहिला बायो सायन्स चित्रपट आहे. जेव्हा संपूर्ण जग कोविड-१९शी लढा देत होते, तेव्हा देशातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी त्याला सामोरे जाण्यासाठी काय प्रयत्न केले हे दाखवले जाईल. या चित्रपटात भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे कोव्याक्सीन तयार करण्याचा प्रवास देखील दर्शविला जाईल. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.