किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२९ ऑगस्ट) – जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने तिरंग्याचा मान राखत सर्वांची मने जिंकली आहेत. बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर नीरजने तिरंग्यासोबत फोटोसाठी पोज दिली. यादरम्यान तो तिरंग्याबद्दल आदर दाखवून चर्चेत आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुवर्णपदक जिंकल्यानंतर हंगेरियन चाहत्याने नीरज चोप्राशी संपर्क साधला. हा चाहता खूप छान हिंदी बोलत होता आणि त्याने नीरजला ऑटोग्राफ मागितला. नीरजने लगेच होकार दिला, पण जेव्हा महिला चाहत्याने ऑटोग्राफसाठी तिरंगा हातात धरला तेव्हा नीरजने भारतीय ध्वजावर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने महिलेच्या हातावरील टी-शर्टचा ऑटोग्राफ केला. नीरजच्या तिरंग्याबद्दलच्या आदराने सर्वांची मनं जिंकली. तथापि, पदक जिंकल्यानंतर नीरजने सांगितले की त्याला या स्पर्धेत ९० मीटरचा टप्पा ओलांडायचा होता, परंतु परिस्थिती पूर्णपणे त्याच्या अनुकूल नव्हती. यापुढील स्पर्धेतही तो यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.