किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२८ फेब्रुवारी ) – अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला फीफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार दुसर्यांदा जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. २०१६ मध्ये सुरू झालेला हा पुरस्कार २-२ वेळा क्रिस्टियानो रोनाल्डो, रॉबर्ट लेवांडोस्की आणि मेस्सी आणि लुका मॉड्रिकने एकदा जिंकला आहे. त्याने यावेळी फ्रान्सच्या किलियन एमबाप्पे आणि करीम बेंझेमा यांचा पराभव केला आहे. यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते, टीम आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
पुरस्काराचे अनेक फोटो शेअर करत लिओनेल मेस्सीने इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ज्याने मला हा पुरस्कार जिंकणे शक्य केले त्या सर्वांचे आभार. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या सर्व लोकांना, माझे कुटुंब आणि मित्रांना, आमच्यावर विश्वास ठेवणार्या ४५ दशलक्ष अर्जेंटिनियांना आणि फीफा द बेस्ट च्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन, विशेषत: लिओ स्कालोनी आणि एमी मार्टिनेझ, जे दोघेही पुरस्कारासाठी पात्र होते. सर्वांना मिठी मारतो आणि लवकरच भेटू! मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने गेल्या वर्षी फिफा फुटबॉल विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला होता. अर्जेंटिनाने रोमहर्षक अंतिम सामन्यात फ्रान्स संघाचा पराभव केला, ज्यामध्ये किलियन एमबाप्पे आणि करीम बेंझेमा यांच्यासारखे खेळाडू होते. मेस्सीच्या नावावर ७ वेळा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे. मात्र, गेल्या वर्षी हा पुरस्कार करीम बेन्झेमाला मिळाला होता. मात्र, ख्रिस्तियानो रोनाल्डोला सर्वाधिक वेळा या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.