किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– खातेवाटपावर चर्चा,
मुंबई, (०३ जुलै) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खातेवाटपाबाबत चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार, छगन भुजबळांसह राकाँचे इतर काही नेते फडणवीसांचे अधिकृत निवासस्थान ‘मेघदूत’ येथे पोहोचले. त्यांनी खातेवाटपावर फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली, अशी माहिती अजित पवार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली. यापर्वी अजित पवार यांच्याकडे जलसंपदा, ऊर्जा आणि अर्थ यासारखी खाती होती. सध्या ही तिनही खाती फडणवीसांकडे असून, त्यांच्याकडे गृहविभागही आहे.