किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– शरद पवारांचा मोठा निर्णय,
मुंबई, (०३ जुलै) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार यांच्या नेतृत्वात एक मोठा गट शिवसेना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर संतप्त झालेले राकाँचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी खासदार प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवायांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
तत्पूर्वी, खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिले होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही खासदारांचे हे कृत्य पक्षविरोधी कारवायांचा भाग मानत बडतर्फीची कारवाई करण्यात आली. पक्षाच्या रजिस्ट्रीमधूनही त्यांच्या नावांची नोंदणी रद्द करण्यात यावी, असा आदेश शरद पवार यांनी दिला आहे.
सुप्रिया सुळेंचे पत्र
‘खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई करीत २ जुलै रोजी झालेल्या शपथविधीला उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांनी पक्षाची औपचारिक परवानगी घेतली नव्हती. पक्षाध्यक्षांना अंधारात ठेवत, त्यांना कोणतीही कल्पना न देता या नेत्यांनी काही गोष्टी केल्या. त्यामुळे ते पक्षातून बडतर्फीस पात्र ठरतात. या खासदारांनी पक्षाची विचारसरणी बाजूला सारल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचाही विश्वासघात केला. त्यामुळे राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत या नेत्यांवर तत्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी.’