किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– मूडीजचा सुधारित अंदाज,
नवी दिल्ली, (१ मार्च) – २०२३ मध्ये भारताचा विकास दर ५.५ टक्के राहील असा सुधारित अंदाज मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने बुधवारी वर्तवला. यापूर्वी हा दर ४.८ टक्के राहण्याचा अंदाज मूडीजने वर्तवला होता. अर्थसंकल्पात भांडवली खर्चात करण्यात आलेली वाढ आणि लवचिक आर्थिक वेग लक्षात घेता मूडीजने हा सुधारित अंदाज वर्तवला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात २०२२ साठी वर्तवलेल्या सुधारित अंदाजात, भारताचा आर्थिक वेग घटून ६.८ टक्के होईल, असे म्हटले होते. तत्पूर्वी हा वेग ७ टक्के राहण्याची शक्यता मूडीजने वर्तवली होती.
‘ग्लोबल मॅक‘ो आऊटलूक २०२३-२४’ च्या फेब‘ुवारीतील अहवालात मूडीजने अमेरिका, कॅनडा, युरोप, भारत, रशिया, मेक्सिको आणि जी-२० मधील अर्थव्यवस्थांच्या २०२३ मधील आधारभूत वाढीचा अंदाज २०२२ च्या तुलनेत वाढवला होता. भारताच्या बाबतीत वर्तवलेल्या सुधारित अंदाजामध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्चाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत १० ट्रिलियन रुपयांचा (जीडीपीच्या ३.३ टक्के) समावेश आहे. ही मार्च २०२३ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातील ७.५ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहे. यासह मूडीजने २०२३ मध्ये जीडीपी ५.५ टक्के या वेगाने तर, २०२४ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे. भारतासह अनेक मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठेतील देशांमध्ये आर्थिक गती, जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक वातावरणात अपेक्षेपेक्षा अधिक लवचिक असल्याचे सिद्ध झाले, असे मूडीजने म्हटले आहे.