किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (१३ फेब्रुवारी ) – साऊथचा सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ चित्रपटाने धमाल केली होती. त्यांचा ‘केजीएफ २’ही सुपरहिट ठरला होता. ऋषभ शेट्टीच्या ‘कंतारा’ या चित्रपटानेही अशीच मोहिनी पसरवली आहे. अलीकडेच यश आणि ऋषभ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये यश पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. तर ऋषभ शेट्टी पांढरा शर्ट आणि लुंगीमध्ये दिसत आहे. दोन्ही स्टार्स पीएम मोदींसोबत हात जोडून पोज देताना दिसत आहेत. दिवंगत अभिनेता पुनित राजकुमारची पत्नी अश्विनी देखील यश आणि ऋषभ शेट्टीसह या बैठकीला उपस्थित होती. यादरम्यान दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांचीही आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट कलाकारांना सांगितले की दक्षिणेकडील राज्यांच्या चित्रपट उद्योगाने त्यांच्या कामाने भारताची संस्कृती आणि ओळख मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. विशेषत: उद्योगात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.