किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज,
नवी दिल्ली, (०८ सप्टेंबर) – जी-२० शिखर परिषदेचे यजमानपद भारताला मिळाले आणि येथे विविध विषयांवरील बैठकांचे आयोजन सुरू झाले. मागील काही महिन्यांपासून देशातील विविध प्रमुख शहरांत वेगवेगळ्या विषयांवरील बैठका, चर्चासत्रे आयोजित केली होती. पण अंतिम बैठक देशाची राजधानी दिल्लीत होणार आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दिल्ली देश-विदेशातील पाहुण्यांनी गजबजणार आहे. जी-२० सदस्य देशांचे प्रमुख दिल्लीत आले आहेत आणि त्यांची सुरक्षा तसेच आदरातिथ्यासाठी राजधानी सज्ज आहे. चांद्रयान-३, नटराज, तिरंगी रंगांच्या रोषणाईने दिल्ली उजळून निघाली आहे. विमानतळासह रस्त्यांवर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
विमानतळासह राजधानीचे रस्ते जी-२० लोगो आणि विद्युत दिव्यांनी सजवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी हे दृश्य अप्रतिम दिसते. रस्तेच नाही तर इमारतींनाही तिरंगी सजावट करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नवी दिल्लीचे विमानतळ पूर्णपणे सज्ज आहे. संपूर्ण दिल्ली जणू तिरंगी रंगात न्हाऊन निघाली आहे. याशिवाय दिल्लीत अनेक ठिकाणी विविध देशांचे राष्ट्रध्वज फडकवण्यात आले आहेत. जगातील प्रमुख-२० देशांचे फडकणारे ध्वज एकत्र ठेवण्यात आले आहेत. जी-२० परिषद ज्या ठिकाणी होणार आहे, तो परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आला आहे. तिथे विविध रंगांचा लाईट शो देखील आहे. शिखर परिषद आयटीपीओ कन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान येथील ‘भारत मंडपम्’ येथे होणार आहे. आयटीपीओ कन्व्हेन्शन सेंटरला खास सजावट करण्यात आली आहे. भारत मंडपम्मध्ये नटराजाची मूर्ती बसवण्यात आली असून त्यावरही लाईटिंग करण्यात आली आहे.
चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी-२० च्या पृष्ठभूमीवर चांद्रयान-३ चे चित्र देखील भिंतींवर रेखाटण्यात आले आहे. परदेशी पाहुण्यांचे आगमन आणि त्यांची सुरक्षा पाहता सर्व यंत्रणा सतर्क असून दिल्लीत अतिशय चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रस्त्यालगतची सर्व उद्याने सुशोभित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये भारताची ओळख दाखवणारे पुतळेही बसवण्यात आले आहेत.