किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी ) – सर्व्हायकल कॅन्सर अर्थात् गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे उशिराने दिसू लागल्याने या आजाराचे गांभीर्य समोर येत आहे. यासंदर्भात मोठी बातमी समोर आली असून, केंद्र सरकार जूनमध्य सहा राज्यांमध्ये ९ ते १४ वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर विरोधी लस देण्यास सुरुवात करू शकते.
सूत्रांनी सांगितले की, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांमध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण केले जाईल, त्यात कर्नाटक, तामिळनाडू, मिझोरम, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशचा समावेश आहे. या सहा राज्यांमधील २.५५ कोटी मुलींना ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचव्हीपी) लसीकरणाचे लक्ष्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये एचपीव्ही लसीचा समावेश करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. तसेच २०२६ पर्यंत एचपीव्ही लसीचे १६.०२ कोटी मात्रा खरेदी करण्यासाठी एप्रिलमध्ये जागतिक निविदा काढली जाण्याची शक्यता आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने कर्करोगाविरुद्ध आणली लस
मागील महिन्याच्या सुरुवातीला, सीरम इन्स्टिट्यूटने सर्व्हायकल कॅन्सरविरुद्ध स्वदेशी ‘सर्व्हाव्हॅक’ लस सादर केली होती. भारतात बनवलेली ही पहिली मानवी पॅपिलोमाव्हायरस लस आहे. सीरममधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाशकुमार सिंह यांनीही आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. पहिली स्वदेशी एचपीव्ही लस खाजगी बाजारात २,००० रुपये प्रती मात्रेत उपलब्ध करून दिली जाईल. इतकेच नव्हे तर सर्व्हाव्हॅक दोन-मात्रावाल्या काचेच्या कुपीमध्ये उपलब्ध असेल, असे या पत्रात नमूद केले होते. सध्या विदेशात बनवलेली सर्व्हायकल कॅन्सरविरुद्धची लस देशात उपलब्ध आहे. अमेरिकन कंपनी मर्कच्या एचपीव्ही लसीची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय लसीकरण कार्यक्रमात एचपीव्ही लसीचा समावेश करण्यावर विचार करीत आहे.
१० पैकी ८ महिला सर्व्हायकल कॅन्सरने ग्रस्त
जगातील एकूण महिला लोकसंख्येपैकी १६ टक्के स्त्रिया भारतात राहतात, परंतु गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणार्या महिलांची संख्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश आहे. आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ८० हजार स्त्रिया दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने प्रभावित होतात आणि त्यापैकी ३५ हजार मरण पावतात. परिस्थिती अशी आहे की, देशात दर दोन मिनिटाला एका महिलेला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. देशातील १० पैकी ८ महिला या कर्करोगाने ग‘स्त आहेत.