किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे ४८ तास शिल्लक राहिले असताना राजकीय पारडे आपल्या बाजूने झुकविण्यात भाजपाला अंतिम टप्प्यात यश आल्याचे दिसत आहे.
रीसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (आरडीआय) या संस्थेच्या सर्वेक्षणात भाजपाने मुसंडी मारली असून, भाजपाला ४१ ते ४५ च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर आम आदमी पार्टीला २५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आरडीआयने केलेल्या सर्वेक्षणानुसार आपला २१ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला ४१ टक्के तर, आपला ३६ टक्के मतदान होण्याची शक्यताही सर्वेक्षणातून वर्तविण्यात आली आहे. कॉंग्रेसची स्थिती अतिशय वाईट असून या पक्षाला केवळ १२ टक्के मते व ० ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
२०१३ च्या निवडणुकीत भाजपाने ३३ टक्के मतांसह ३१ जागा जिंकल्या होत्या तर, शिरोमणी अकाली दलाला एक जागा मिळाली होती. २५ टक्के मते मिळवून आपने २८ जागा पदरात पाडल्या होत्या. तर २५ टक्के मते मिळवूनही कॉंग्रेसला मात्र ८ जागाच मिळाल्या होत्या.आरडीआयच्या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या किरण बेदी या मुख्यमंत्रिपदासाठी लोकांची पहिली पसंत ठरल्या आहेत. त्यांना ४६ टक्के लोकांनी कौल दिला आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दुसर्या क्रमांकावर असून त्यांना ४० टक्के नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. कॉंग्रेसचे अजय माकन यांना १२ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला असून ते तिसर्या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणात २१ हजार नोंदणीकृत मतदारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील २५ बूथवरील प्रत्येकी ३०० मतदारांचे मत जाणून घेण्यात आले.