किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [१६ सप्टेंबर] – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा म्हणजे गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा लोकांचा विश्वास उडेल, असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष रीत्या शरसंधान साधले आहे.
या बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार आणि इतर ७६ नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.
राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मी घेतला होता. माझा हा निर्णय अनेकांना आवडला नव्हता. मात्र त्यानंतर प्रशासक नेमून आम्ही ११०० कोटी रुपये तोट्यात असलेली बँक ७०० कोटींनी फायद्यात आणली. पण दोषींवर राजकीय आकसाने नाही तर नियमाप्रमाणे कारवाई करावी, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
असा झाला घोटाळा
२००७ ते २०१० या तीन वर्षांच्या काळात जे व्यवहार झाले, त्यात बँकेला १०८६ कोटींचे नुकसान केल्याचा आरोप तत्कालीन संचालक मंडळावर लावण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप, कुठलेही धोरण नसताना परदेश दौरे, मालमत्तांची विक्री करताना बँकेचे नुकसान असे अनेक आरोप या माजी संचालकांवर निश्चित करण्यात आले आहेत.
या संचालकांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, भाजपा नेते पांडुरंग फुंडकर, कॉंग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचाही समावेश आहे.
या प्रकरणात चौकशीसाठी शासनाने शिवाजीराव पहिनकर यांची नियुक्ती केली असून त्यांना देण्यात आलेल्या दिवाणी आणि फौजदारी अधिकारांनुसार हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.