किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
हैद्राबाद, [१७ सप्टेंबर] – गोदावरी व कृष्णा या दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या. पण, त्या आंध्रप्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत असल्याने त्या नद्या जोडण्याचा पहिला मान आंध्रप्रदेशाने मिळवल्याने ते राज्य आता खूप फायद्यात राहणार आहे.
पट्टीसीमा सिंचन योजनेंतर्गत या नद्या जोडण्यात आल्या असून, यशस्वी होणारा हा देशातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे. केंद्रातर्फे चालवल्या जाणार्या ‘नदीजोड योजने’चा हा प्रकल्प भाग नाही, हे याचे वैशिष्ट्य आहे. आंध्र सरकारने स्वत: त्यासाठी निधी उभारला आहे.
कायम दुष्काळी स्थितीचा सामना करणार्या राज्यातील रायलसीमा भागातील १७४ किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे त्या भागातील शेतकरी लाभान्वित होणार असून कृष्णा, गुंटूर, प्रकाशम्, कुरनूल, कडप्पा, अनंतपूर व चित्तूर या जिल्ह्यांतील १७ लाख हेक्टरपैकी १३ लाख हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. त्या बरोबरच हजारो गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्याही यामुळे दूर होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम मध्यप्रदेशातील केन आणि उत्तरप्रदेशातील बेतवा या नद्यांना जोडण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रशासनिक कारणांमुळे रखडलेला हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर त्याला पहिला मान मिळाला असता, पण आंध्रमध्ये पुन्हा सत्तारूढ होताच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन तो आठ महिन्यांत पूर्ण करून एक विक्रम प्रस्थापित केला, हे येथे उल्लेखनीय.
पुरामुळे गोदावरीत येणारे अतिरिक्त पाणी पोलवरम येथे कालव्यात पंपाच्या मदतीने टाकण्यात येणार असून, विजयवाडा येथे ते कृष्णा नदीत पोहोचणार आहे. बुधवारी या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्याने या भागातील शेतकरीच नव्हे, तर सर्वसामान्य जनता सुखावली असून ते चंद्राबाबूंना धन्यवाद देत आहे.