किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.34° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.34° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=प्रणव मुखर्जी यांची मोहर=
नवी दिल्ली, [२७ जानेवारी] – केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीवर मोहर उमटविताना, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज बुधवारी अरुणाचल प्रदेशला राष्ट्रपती राजवटीखाली आणले. तिथेच, आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करीत, ते सिद्ध करण्याचीही तयारी आहे, असे मुख्यमंत्री नबम तुकी यांनी सांगितले.
राजकीय अस्थिरता असलेल्या अरुणाचलात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी आज ही शिफारस मान्य केली.
गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी अरुणाचलमधील कॉंग्रेस २१ आमदार बंडखोरी करून भाजपात आले होते. ६० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे आधी फक्त ११ आमदार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर अरुणाचलमध्ये सत्तापालटाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. विधानसभा अध्यक्षांना डावलत उपाध्यक्षांच्या मदतीने अविश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
सुप्रीम कोर्टाची नोटीस
अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली. या राज्यातील राजकीय स्थितीवर न्यायालयात याचिका प्रलंबित असताना, ताज्या घडामोडींची माहिती न्यायालयाला न देता, असा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल करीत, न्यायालयाने केंद्राला दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १ फेबु्रवारी रोजी होणार आहे.