किमान तापमान : 23.61° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=अखेर ४२ वर्षांचा संघर्ष थांबला !,=
मुंबई, [१८ मे] – गेली ४२ वर्षे मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोमात असलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांचे आज सोमवारी सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. आज त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला होता. तसेच त्यांच्या फुप्फुसांना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मागील तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. शनिवारपासून त्या उपचाराला प्रतिसाद देत होत्या त्यामुळे डॉक्टरांना थोडीफार आशा होती. मात्र, आज सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अरुणा यांचे जवळचे नातेवाईक फारसे कोणी नाही. त्यांना एक बहिण होती मात्र त्यांच्याबाबत फारशी माहिती रुग्णालयाकडे नाही. अरुणा यांचे कोणी जवळचे नातेवाईक असतील त्यांनी पुढे यावे असे आवाहन केईएम रुग्णालयाने केले आहे. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सामाजिक वर्तुळात आणि रुग्णालयात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
२७ नोव्हेंबर १९७३ मध्ये रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने त्यांच्यावर पाशवी बलात्कार केला होता. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या मेंदूची नस दुखावली होती. तेव्हापासून त्या कोमातच होत्या. त्यांना केवळ एक बहिण होती. रुग्णालयातील खर्च त्यांना पेलवण्यासारखा नसल्यामुळे गेली ४२ वर्ष त्या के ईम रुग्णालयातच होत्या. रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टर्स त्यांची काळजी घेत होत्या. ज्यावेळी त्यांच्यावर बलात्कार झाला त्यावेळी त्या केवळ २० वर्षाच्या होत्या. अरुणा यांना त्रासातून मुक्त करण्यासाठी दयामरणाची मागणीही केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली. दरम्यान, अरुणावर बलात्कार करणारा वॉर्डबॉय शिक्षा भोगून बाहेरही पडला. मात्र अरुणा यांचा संघर्ष अद्यापही सुरुच होता. हा संघर्ष आज सोमवारी थांबला.