किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=महाराष्ट्रावर ३ लाख ४७७ कोटींचे कर्ज=
मुंबई, [१७ मार्च] – २०१५-१६ या वर्षाचा राज्याचा भाजपा-सेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवार, १८ मार्च रोजी विधिमंडळात सादर करणार आहेत. राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर, दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास दर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर सादर केला जाणार्या या अर्थसंकल्पाकडे सार्या राज्याच्या नजरा लागल्या आहेत.
वाढती महसुली तूट आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याच्या डोक्यावर ३ लाख ४७७ कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या हप्त्यापोटी राज्य सरकारला प्रतिवर्षी व्याजाचे २३ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर येताना राज्यावर ४४ हजार कोटींचे कर्ज होते. गेल्या १३ वर्षात यामध्ये पाचपटींपेक्षा अधिक वाढ होऊन ते २ लाख ५४ हजार कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे राज्याचे सकल उत्पन्न, महसुली तूट, महसुली जमा-खर्च याचे योग्य नियोजन करून, निधीचे विनियोजन करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे.
दुष्काळाचे आव्हान समोर ठाकल्याने राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकारला वेगळे मार्ग शोधण्याची गरज आहे. तसेच औद्योगिक दराचा वेग वाढविण्यासाठी राज्यात गुंतवणूक वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याची गरज असली तरी भांडवली खर्च कमी केल्यास विकास दरावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावेळेचा अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवारांचा चांगलाच कस लागणार आहे.
अर्थसंकल्पाच्या भाषणाचे होणार ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प दुपारी २ वा. महाराष्ट्र विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्प सादर करतानाच्या भाषणाचे ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ करण्यात येणार आहे. हे ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ अर्थ विभागाने नुकत्याच सुरू केलेल्या लिंक वर बघता येणार आहे.