किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.61° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल=१५ दिवसात मागितले उत्तर=
लखनौ, [२७ जून] – दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टीच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रारूप तयार करणारे सुनील लाल यांनी आज शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस जारी करून, १५ दिवसांत उत्तर मागितले आहे.
मोठ्या विश्वासाने मी केजरीवाल यांच्या पक्षाकरिता बोधचिन्ह तयार केले. पण, हा पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून बराच दूर गेला आहे. पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या पक्षासोबत मी आपले संबंध संपुष्टात आणला आणि बोधचिन्हाचा कॉपीराईट करून तो परत मागितला. पण, केजरीवाल अजूनही या लोगोचा वापर करीत आहे. त्यामुळे आपण वकिलामार्फत त्यांना नोटीस जारी केली आहे, असे सुनील लाल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मी तयार केलेल्या बोधचिन्हावर आता केवळ माझीच मालकी असल्याने तो परत करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र मी केजरीवाल यांना गेल्या ७ एप्रिल रोजी लिहिले होते. पण, त्या पत्रालाही त्यांनी उत्तर दिले नाही. पोस्टर्स, बॅनर्स, ध्वज, वेबसाईट आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी माझ्या लोगोचा वापर करू नये, अशी विनंती मी त्यांना वारंवार केली. मात्र, त्याकडेही केजरीवालांनी दुर्लक्ष केल्याने त्यांना नोटीस पाठविणे भाग पडले, असेही ते म्हणाले.