किमान तापमान : 28.3° से.
कमाल तापमान : 28.76° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.76° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.56°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट=
नवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] – आपले यकृत आता केवळ २५ टक्केच कार्यरत असून आपल्याला हेपेटायटीस बीची लागण झाली असल्याचा गौप्यस्फोट महानायक अमिताभ बच्चन यांनी केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे चालवल्या जाणार्या हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून बच्चन यांच्या नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला.
१९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात जबर रक्तस्त्राव झाल्याने अमिताभ यांना सुमारे २०० जणांनी एकून ६० बाटल्या रक्तदान केले होते. त्यांपैकी कुणीएक व्यक्ती हेपेटायटीस बी ग्रस्त होता. त्यामुळे त्याच्याकडून या रोगाची लागण आपल्यालाही झाली मात्र याबाबत आपल्लायला २००० साली म्हणजे तब्बल १८ वर्षांनंतर कळलं असे ते यावेळी म्हणाले.
स्वतःच्या यकृताची स्थिती वर्णन करताना त्यांनी आता आपले यकृत ७५ टक्के निकामी झाले असून आता केवळ उरलेल्या २५ टक्के भागावरच आपण आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले व उपस्थितांना हेपेटायटीस बी ची लस घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रबोधन केले. तसेच उपचाराने या आजारावर मात करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी येथे आवर्जून सांगितले.