किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=विधानसभेच्या दोन जागा भाजपाने जिंकल्या=
इम्फाळ, [२४ नोव्हेंबर] – मणिपूर विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने चक्क दोन जागांवर विजय मिळविला. थेंगमेईबांद आणि थोंगजू या दोन जागा जिंकून मणिपुरात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे.
या दोन्ही जागांवर भाजपाने कॉंगे्रसचा पराभव करून, या पक्षाला जबरदस्त धक्का दिला. भाजपाचे जॉयकिशन सिंग यांनी थेंगमेईबांद विधानसभेची जागा जिंकली. त्यांना १२, ०९८ मते आणि कॉंग्रेसचे ज्योतिन वैखोम यांना १०,१९५ मते मिळाली. त्याचप्रमाणे, भाजपाचे विश्वजित सिंग यांनी थोंगजू विधानसभेची जागा जिंकली. येथे त्यांना १४,६०५ मते आणि कॉंगे्रसचे बिजॉय कोईजाम यांना ११,३९३ मते मिळाली, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करताना दिली.
मणिपूर डेमॉकॅ्रटिक पीपल्स पार्टीचे जी. ए. तोनसाना शर्मा यांना दोन्ही मतदारसंघात आवश्यक मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
मूळचे कॉंगे्रसचेच आमदार असलेले जॉयकिशन सिंग आणि विश्वजित सिंग यांना मणिपूर विधानसभा अध्यक्षांनी गेल्या २८ रोजी पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेऊन अपात्र ठरविले होते. यामुळे ही पोटनिवडणूक घेणे अनिवार्य झाले होते.
मध्यप्रदेशात सत्तारूढ असतानाही रतलाम-झाबुआ लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार निर्मला भुरिया यांना पराभव पत्करावा लागला. तिथेच देवास विधानसभेची जागा स्वत:कडे कायम राखण्यात भाजपाला यश आले आहे. रतलाम-झाबुआ लोकसभा संघात कॉंग्रेसचे कांतिलाल भुरिया यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. कांतीलाल भुरिया यांना ५,३६,७४३ मते, तर निर्मला भुरिया यांना ४,४७,९११ मते मिळाली. देवास विधानसभा संघात भाजपाच्या गायत्री राजे पौर यांनी कॉंगे्रसचे जयप्रकाश शास्त्री यांना ३०,७७८ मतांच्या फरकाने पराभूत केले आहे.
मिझोरममध्ये कॉंगे्रसचा विजय
मिझोरममधील ऐझवाल उत्तर विधानसभा जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत कॉंगे्रसचे उमेदवार आणि माजी आरोग्यमंत्री लालथानझारा विजयी झाले आहे. त्यांनी मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार वनलालवेना यांचा पराभव केला.
वारंगलची जागा टीआरएसकडे
तेलंगणात सत्तारूढ असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीने वारंंगल लोकसभेची जागा तब्बल ४.६० लाख मतांच्या मोठ्या फरकाने जिंकत स्वत:कडेच कायम ठेवली आहे. टीआरएसचे पसुनूरी दयाकर यांना ६,१५,४०३ मते मिळाली, तर कॉंगे्रसचे उमेदवार एस. सत्यनारायण यांना केवळ १,५६,३११ मते मिळाली.