किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल=तो आवाज हार्दिकचाच=
अहमदाबाद, [२५ नोव्हेंबर] – पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना राष्ट्रध्वज पायदळी तुडविणारा आणि पोलिसांना जिवे मारण्यासाठी युवकांना प्रोत्साहन करणारा हार्दिक पटेल आता चांगलाच अडचणीत आला आहे. पोलिसांना ठार मारण्यासाठी प्रोत्साहित करणार्या सीडीतील आवाज हार्दिकचाच असल्याचे न्याय सहायक प्रयोगशाळेत स्पष्ट झाले आहे.
शहर गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात हार्दिकविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर गांधीनगर गुन्हे शाखेच्या विनंतीवरून त्याच्या आवाजाची सीडी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. भाषणाच्या सीडीतील आवाज आणि हार्दिकचा आवाज एकच असल्याचे प्रयोगशाळेने आज बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
गांधीनगर येथील एका भाषणात पटेल समाजाच्या एका तरुणाने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर हार्दिकने आपल्या काही खास सदस्यांना फोन करून, आत्महत्या करण्यापेक्षा प्रत्येकाने चार ते पाच पोलिसांना ठार मारावे, असे सांगितले होते. त्याचा हा संवाद रेकॉर्ड करण्यात आला होता.