किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशभोपाळ, [२९ नोव्हेंबर] – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज रविवारी मुख्यमंत्रिपदाची दहा वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. सलग दहा वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविणारे ते पहिलेच गैरकॉंगे्रसी नेते ठरले आहेत. असे करताना त्यांनी १९९३ ते २००३ असा सलग काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले दिग्विजयसिंह यांचाही विक्रम मोडित काढला आहे.
व्यावसायिक परीक्षा मंडळातील (व्यापमं) कथित घोटाळा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला भाजपाचा पराभव या दोन घटना शिवराजसिंह यांच्या कारकीर्दीला त्रासदायक ठरल्या असल्या, तरी त्यांचा एकूण कार्यकाळ समाधानकारक असाच राहिला. दरम्यान, शिवराजसिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची दहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल भाजपाने रविवारी सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मध्यप्रदेशात भाजपा २००३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर चौहान यांनी २९ नोव्हेंबर २००५ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सुरुवातीच्या काळात म्हणजेच ८ डिसेंबर २००३ ते २२ ऑगस्ट २००४ या काळात उमा भारती यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते. त्यानंतर बाबुलाल गौड यांच्याकडे हे पद आले होते. २९ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. गौड सध्या शिवराजसिंह मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेत.
दिग्विजयसिंह हेदेखील सलग १९९३ ते २००३ या काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले असले, तरी त्यांनी दहा वर्षांची कारकीर्द पूर्ण केली नव्हती. पण, शिवराजसिंह यांनी ही कारकीर्द पूर्ण करून त्यांचा विक्रम मोडित काढला आहे.