किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलवॉशिंग्टन, [३१ ऑगस्ट] – अतिजलद संपर्काचे माध्यम असलेल्या ई-मेल सुविधेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही ई-मेल सुविधा मुंबईत जन्मलेल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने जगाला दिलेली देणगी आहे. त्यांचे नाव व्ही. ए. शिवा अय्यादुराई असून त्यांनी जेव्हा १९७८ मध्ये ई-मेलचा शोध लावला होता त्यावेळी त्यांचे वय जेमतेम १४ वर्षांचे होते! त्यांनी ‘ई-मेल’ नावाच्या एका कॉम्प्युटर प्रोग्रॅमची निर्मिती केली. अमेरिकन सरकारने १९८२ मध्ये अय्यादुराई याला ई-मेलचा कॉपीराईट बहाल करून ई-मेलचा निर्माता म्हणून त्याच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले.
मुंबईत एका तामिळ कुटुंबात जन्मलेले अय्यादुराई हे वयाच्या सातव्या वर्षी कुटुंबासोबत अमेरिकेत गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कोरंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसने आयोजित केलेल्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगविषयक उन्हाळी वर्गात त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर लिव्हिंगस्टन हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूजर्सीच्या विद्यापीठात ते संशोधनही करत होते. तेथील लॅब कॉम्प्युटर नेटवर्कचे लेस्ली मायकलसन यांनी या युवकाची गुणवत्ता हेरली. संस्थेतील कागदावरील पत्रव्यवहाराची जुनी पद्धत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत रुपांतरित करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे ठेवले.
अशा प्रकारची संदेशवहनाची यंत्रणा तयार करणे, ही या संस्थांना फार गुंतागुंतीची, अशक्यप्राय बाब वाटत होती. अय्यादुराई यांनी डेस्कटॉप आणि टाईपरायटरचा अभ्यास केला असता त्यात इनबॉक्स, आऊटबॉक्स, ड्राफ्ट्स, फोल्डर्स, ऍड्रेस बुक अशी यंत्रणा होती. यावरून पत्रव्यवहाराच्या इलेक्ट्रॉॅनिक यंत्रणेची कल्पना करून त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार केला. त्यांच्या या संकल्पनेने आज व्यापक रूप घेतले असून वेगवान जगात ई-मेल एक वरदानच ठरले आहे.