किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=पंकजा मुंडे यांचे आवाहन, वाशीम शहरात जल्लोषात स्वागत=
वाशीम, [३० ऑगस्ट] – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने घवघवीत यश मिळवून केंद्रातील भ्रष्ट कॉंग्रेस आघाडी सरकार उलथवून टाकले. त्याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी भ्रष्ट कॉंग्रेस – राकॉं आघाडीचे सरकार महाराष्ट्रातून घालवण्यासाठी जिद्दीने कामाला लागावे, असे मुंडेंच्या कन्या आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी वाशीम येथे केले.
आमदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून निघालेल्या संघर्षयात्रेचे आज, ३० रोजी वाशीम शहरात आगमन झाले. मराठवाड्यातील हिंगोली येथून संघर्ष यात्रेचे विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या राजगाव येथे भारतीय जनता पार्टी वाशीम जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर ही संघर्षयात्रा वाशीम शहरातील पुसद नाका येथे दाखल होताच याठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून भव्य स्वागत केले. त्यानंतर ही संघर्ष यात्रा पुसद नाका ते आंबेडकर चौक मार्गे नगर परिषद रोड मार्गे, सौदागरपुरा, बालू चौक, शिवाजी चौक मार्गे जाऊन पाटणी चौक येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, कॉंग्रेस आघाडीने पाच वर्षांचा युतीचा कार्यकाळ वगळता सर्वाधिक महाराष्ट्रात सत्ता उपभोगली. मात्र, कॉंग्रेसच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले. भ्रष्ट कॉंग्रेसला कंटाळलेल्या जनतेने केंद्रातील कॉंग्रेसची सत्ता उलथवून टाकली. आता आगामी लढाई महाराष्ट्र जिंकण्याची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ही संघर्ष यात्रा भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून या संघर्षयात्रेत आमदार लखन मलिक, पश्चिम विदर्भ संघटनमंत्री रामदास आंबटकर आदींसह हजारो भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारुन संघर्षयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. वाशीम येथील कार्यक्रम आटोपून ही संघर्षयात्रा नंतर मालेगावकडे रवाना झाली.